मोदींच्या मंत्रिमंडळातून रावसाहेब दानवेंना डच्चू? मंत्रिमंडळातून 8 -12 जणांची उचलबांगडी होणार

रावसाहेब दानवे यांचा दोनवेळा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांच्याकडे ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. दरम्यान, आज राष्ट्रपती भवनात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. 

    नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. महाराष्ट्रातून चार नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल तर रावसाहेब दानवे यांची उचलबांगडी केली जाण्याची शक्यता आहे. रावसाहेब दानवे यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवले जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

    केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. महाराष्ट्रातून प्रीतम मुंडे, भागवत कराड, कपिल पाटील आणि नारायण राणे यांना मंत्रिपद मिळणार अशी शक्यता आहे. तर 8 -12 जणांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी होणार आहे. यामध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.