दिल्लीत म्युकरमायकोसिसचे दुर्मिळ प्रकरण आले समोर; लहान आतड्यांमध्ये आढळला संसर्ग

आतापर्यंत ब्लॅक फंगसचे एकूण १९७ हून अधिक रुग्ण दिल्लीतील विविध रुग्णालयांमध्ये दाखल असल्याचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे. यामध्ये बाहेरील राज्यातून दिल्लीतील रूग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या रूग्णांचा समावेश आहे.

    नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होता असताना ,दुसरीकडे म्युकरमायकोसिसचा धोका दिवसेदिवस वाढताना दिसत आहे. ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत अशातच ब्लॅक फंगसची एक धक्कादायक दुर्मीळ प्रकरण (रेअर केस) नवी दिल्ली गंगा राम रुग्णालयात नोंदविण्यात आली आहे. या केसमध्ये रुग्णांच्या अनेक बायोप्सीमध्ये ब्लॅक फंगसचे संक्रमण लहान आतड्यांमध्ये दिसून आले आहे. गंगा राम रुग्णालयात ५६ ते ६८ वर्षे वयोगटातील दोन रुग्णांच्या लहान आतड्यात हे संक्रमण असल्याचे आढळले. डायबेटीज असलेल्या दोन्ही रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती, परंतु त्यापैकी केवळ एकालाच स्टिरॉइड देण्यात आले होते.