सीमा सुरक्षा दलात विविध पदांवर भरती ; असा करा अर्ज

तरुणांसाठी नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. सीमा सुरक्षा दलात (BSF) विविध पदांसाठी पदभरती होणार आहे. BSF मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली: कोरोना काळात अनेक लोकांना आपल्या नोकऱ्यांशी हात धुवावे लागले. तरुण वर्गावर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळलेली आहे. मात्र तरुणांसाठी नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. सीमा सुरक्षा दलात (BSF) विविध पदांसाठी पदभरती होणार आहे. BSF मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एसआय (SI), एएसआय (ASI) ऑपरेशन थिएटर टेक्निशियन (Operation Theatre technician), एएसआय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (ASI Laboratory technician), सीटी (CT), एचसी (HC), हवालदार (Constable), सहाय्यक विमान मॅकेनिक (Assistant Aircraft Mechanic),सहाय्यक रेडिओ मेकॅनिक (Assistant Radio mechanic). या पदांकरता अर्ज मागवण्यात येत आहेत. सीमा सुरक्षा दल भरती साठी एकूण १७५ रिक्त जागा आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जुलै २०२१आहे.

    या आहेत जागा

    सीमा सुरक्षा दलात एसआय (SI), एएसआय (ASI) ऑपरेशन थिएटर टेक्निशियन (Operation Theatre technician), एएसआय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (ASI Laboratory technician), सीटी (CT), एचसी (HC), हवालदार (Constable), सहाय्यक विमान मॅकेनिक (Assistant Aircraft Mechanic),सहाय्यक रेडिओ मेकॅनिक (Assistant Radio mechanic). या पदांच्या एकूण १७५ पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

    शैक्षणिक पात्रता

    वरील सर्व पदांसाठी उमेदवारांनी दहावी आणि बारावी पास असणं आवश्यक आहे. त्यानंतरच शिक्षण पदानुसार असणं आवश्यक आहे. जाहिरातीत शिक्षासंबंधीची संपूर्ण माहिती देण्यात अली आहे.

    किती मिळेल पगार

    एसआय (SI), एएसआय (ASI) ऑपरेशन थिएटर टेक्निशियन (Operation Theatre technician), एएसआय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (ASI Laboratory technician), सीटी (CT), एचसी (HC), सहाय्यक विमान मॅकेनिक (Assistant Aircraft Mechanic),सहाय्यक रेडिओ मेकॅनिक (Assistant Radio mechanic) या पदांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार २९,२०० – ९२,३०० रुपये प्रति महिना इतका पगार मिळणार आहे. हवालदार (Constable) या पदासाठी सातव्या वेतन आयोगानुसार २१ ,७०० -६९,१०० रुपये प्रति महिना इतका पगार मिळणार आहे.

    असं करा अर्ज

    या पदांसाठी अर्ज करण्यासाठी https://bsf.gov.in/Home या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या पदभरतीची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आणि नोटिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा.