भारतीय वायुसेनेची ४२ विमाने करणार अनोखे शक्तिप्रदर्शन, राफेलच्या कवायतींकडे असणार लक्ष

भारतीय वायूसेनेतर्फे 26 जानेवारीला नवी दिल्लीत विमानांची अनोखी स्अंटबाजी पाहण्याची संधी नागरिकांना लाभणार आहे. यात वायुदलाची 42 विमाने एकत्रित उड्डान भरून आपल्या ताकदीचा परिचय देणार आहे. काही महिन्यांपूर्वीच भारतीय वायूदलात सहभागी झालेल्या राफेल विमानाच्या कवायतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दिल्ली (Delhi).  भारतीय वायूसेनेतर्फे 26 जानेवारीला नवी दिल्लीत विमानांची अनोखी स्अंटबाजी पाहण्याची संधी नागरिकांना लाभणार आहे. यात वायुदलाची 42 विमाने एकत्रित उड्डान भरून आपल्या ताकदीचा परिचय देणार आहे. काही महिन्यांपूर्वीच भारतीय वायूदलात सहभागी झालेल्या राफेल विमानाच्या कवायतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दिल्ली भारतीय हवाई दलात नुकताच सामील झालेला राफेल लढाऊ विमान 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सामील होणार आहे. यादिवशी फ्लायपास्ट समारोपच्या वेळी हे विमान ‘व्हर्टिकल चार्ली फॉर्मेशन’ मध्ये उड्डाण भरणार आहे. त्यामुळे पूर्ण देशवासीयांना या विमानाची आकाशातली जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. अशी माहिती सोमवारी भारतीय हवाई दलाने दिली आहे.

‘व्हर्टिकल चार्ली फॉर्मेशन’ म्हणजे विमान कमी उंचीवर उड्डाण करते, सरळ वर जाते. त्यानंतर आकाशात विविध कसरती केल्या जातात आणि नंतर एका उंचीवर स्थिर होते. विंग कमांडर इंद्रनील नंदी म्हणाले की, राफेल विमानाने “व्हर्टिकल चार्ली फॉर्मेशन’ केल्यानंतर फ्लायपास्टचा समारोप होईल.” ते पुढे म्हणाले की, 26 जानेवारीला फ्लायपास्टमध्ये हवाई दलाची एकूण 38 विमानं आणि भारतीय सैन्याची चार विमानं सहभागी होतील.

यापूर्वी, अशी बातमी आली होती की, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजधानीत मानव रहित विमानं, पॅराग्लायडर आणि हॉट बलून उडवण्यास बंदी घातली आहे. हा आदेश 20 जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी दिली. पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी जारी केलेल्या आदेशात असं म्हटलं आहे की, हा आदेश 20 जानेवारीपासून अंमलात येईल. या आदेशाची अंमलबजावणी पुढील 27 दिवस म्हणजे 15 फेब्रुवारीपर्यंत लागू असणार आहे.