कोव्हिशिल्डचा केवळ १ डोस पुरेसा ठरेल का? सुरु आहे संशोधन, लवकरच होणार अंतिम फैसला

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होणाऱ्या कोव्हिशिल्ड या लसीचा केवळ एकच डोस पुरेसा ठरेल काय, यावर सध्या भारतात संशोधन सुरू आहे. तसे झाले तर अधिकाधिक नागरिकांसाठी लस उपलब्ध होऊन लसींच्या तुटवड्याचा प्रश्न मार्गी लागू शकेल, अशी चर्चा आहे. भारतात सध्या उपलब्ध असणाऱ्या तिन्ही लसींचे दोन डोस घेणं आवश्यक आहे. मात्र नव्या संशोधनानंतर ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. 

    देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातलाय. प्रभावी आणि वेगवान लसीकरण हाच कोरोनावर मात करण्याचा एकमेव उपाय असल्याचं सांगितलं जातं. मात्र भारतात चुकीच्या नियोजनामुळे गेल्या काही आठवड्यांपासून लसींच्या नियोजनात हेळसांड होत असल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत आता प्रत्येक नागरिकाला लसींचे दोन डोस देण्याऐवजी  केवळ एकच डोस देता येईल काय, यावर संशोधन सुरू करण्यात आलंय.

    सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होणाऱ्या कोव्हिशिल्ड या लसीचा केवळ एकच डोस पुरेसा ठरेल काय, यावर सध्या भारतात संशोधन सुरू आहे. तसे झाले तर अधिकाधिक नागरिकांसाठी लस उपलब्ध होऊन लसींच्या तुटवड्याचा प्रश्न मार्गी लागू शकेल, अशी चर्चा आहे. भारतात सध्या उपलब्ध असणाऱ्या तिन्ही लसींचे दोन डोस घेणं आवश्यक आहे. मात्र नव्या संशोधनानंतर ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे.

    भारतात सध्या कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुटनिक व्ही या तीन लसी उपलब्ध आहेत. या तिन्ही लसींचे प्रत्येकी दोन डोस घेणं बंधनकारक आहे. शिवाय यातील ज्या लसीचा पहिला डोस घेतला जाईल, त्याच लसीचा दुसरा डोस घेणं बंधनकारक आहे. यामुळे लसीकरण मोहिमेच्या गतीवर परिणाम होत असून जर एकच  डोस देण्याची पद्धत प्रभावी सिद्ध झाली, तर अधिक वेगाने लसीकरण मोहिम राबवणं शक्य होणार आहे.

    सुरुवातीला लसीच्या दोन मात्रांमध्ये एका महिन्याचं, मग ४५ दिवसांचं आणि त्यानंतर आता १२ ते १६ आठवड्यांचं अंतर ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीनं घेण्यात आलाय. आता दोन डोस देण्याऐवजी एकच डोस पुरेसा ठरेल काय, याविषयी तज्ज्ञांचं पॅनेल संशोधन करतंय. या संशोधनातून कुठले निष्कर्ष समोर येतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे.