सेवानिवृत्तीचे वय अन् पेन्शनची रक्कम वाढविणार; आर्थिक सल्लागार समितीचा पंतप्रधानांना सल्ला

केंद्र सरकार (The central government) लवकरच कर्मचाऱ्यांना (employees) खूशखबर (good news) देऊ शकते. कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय (The retirement age of employees) आणि पेन्शनची रक्कम (the amount of pension) वाढवली जाऊ शकते. हा सल्ला आर्थिक सल्लागार समितीने ....

    दिल्ली (Delhi) : केंद्र सरकार (The central government) लवकरच कर्मचाऱ्यांना (employees) खूशखबर (good news) देऊ शकते. कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय (The retirement age of employees) आणि पेन्शनची रक्कम (the amount of pension) वाढवली जाऊ शकते. हा सल्ला आर्थिक सल्लागार समितीने (the Economic Advisory Committee) पंतप्रधानांना (the Prime Minister) दिला आहे. यात देशातील लोकांची काम करण्याची वयोमर्यादा वाढविण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे.

    तसेच, देशात सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याबरोबरच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीमही सुरू करण्यात यावी, असेही पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने म्हटले आहे. अहवालानुसार, या सूचनेंतर्गत कर्मचाऱ्यांना दरमहा किमान 2000 रुपये पेन्शन देण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे. तसेच, आर्थिक सल्लागार समितीने देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चांगली व्यवस्था करण्याची शिफारस केली आहे. कार्यरत लोकांची संख्या वाढवायची असेल, तर निवृत्तीचे वय वाढविणे नितांत आवश्यक आहे.

    सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी, हा निर्णय घेतला जाऊ शकतो. या अहवालात 50 वर्षांवरील व्यक्तींच्या कौशल्य विकासाबद्दलही सांगण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने, असे धोरण तयार करायला हवे, जेणेकरून कौशल्य विकास करता येईल, असे अहवालात म्हणण्यात आले आहे. या प्रयत्नात, ज्या लोकांकडे प्रशिक्षण घेण्याचे साधन नाही, अशा असंघटित क्षेत्रातील, दुर्गम भागांतील, निर्वासित आणि स्थलांतरित, लोकांचाही समावेश करायला हवा. या लोकांनाही प्रशिक्षित करायला हवे.