lalu yadav

राष्ट्रीय जनता दलचे सुप्रीमो लालू यादव यांना अनेक प्रकारचे आजार आहेत. त्यांचा आजार दिल्लीतील एम्स डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली सुरू आहे. झारखंडच्या उच्च न्यायालयात मागील काही दिवसांपासून चारा घोटाळामध्ये दोषी ठरवण्यात आलेल्या लालू प्रसाद यादव यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती.

    पटणा : RJD चे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना दिल्लीतील AIIMS  रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यानंतर त्यांना तात्काळ दिल्लीतील एम्स रूग्णालयात आणण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, लालू यादव यांच्या छातीत अचानकपणे त्रास होऊ लागल्याने त्यांना तात्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

    राष्ट्रीय जनता दलचे सुप्रीमो लालू यादव यांना अनेक प्रकारचे आजार आहेत. त्यांचा आजार दिल्लीतील एम्स डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली सुरू आहे. झारखंडच्या उच्च न्यायालयात मागील काही दिवसांपासून चारा घोटाळामध्ये दोषी ठरवण्यात आलेल्या लालू प्रसाद यादव यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती. जामिनावर सुटका करण्यात आल्यानंतर सुद्धा लालू दिल्लीतून पटणामध्ये आले नाहीत. त्यांची प्रकृती आणि आजार हे यामागील कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.

    याशिवाय अजून काही कारण म्हणजे त्रासांमुळे त्यांना दिल्लीतील एम्समध्ये धाडण्यात आलं होतं. लालू यादव यांच्या प्रकृतीत जास्त प्रमाणात बिघाड असल्यामुळे त्यांना एम्समध्ये आणण्यात आलं आहे की, रूटीन चेकअप रूग्णालयात आणण्यात आलं आहे. याबाबत अजूनही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये.

    लालू यादव सध्या दिल्लीत त्यांची मुलगी मीसा भारती यांच्या निवासस्थानी आहेत. त्यांची पत्नी माजी मुख्यमंत्री राबडी देवी सुद्धा दिल्लीमध्ये आहेत. तसेच तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव सुद्धा दिल्लीमध्ये उपस्थित आहेत. काल रात्री तेज प्रताप यादव लालू प्रसाद यादव यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. तेज प्रताप आणि तेजस्वी यांच्यात संघर्षात्मक परिस्थिती निर्माण आहे. त्यामुळे ही स्थिती सोडवण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले. परंतु मामला अजूनही गरम असल्याचं समजलं जात आहे.