Roche's Covid-19 antibody cocktail launched in India

औषध कंपनी रोशे इंडियाने आपली अॅण्टिबॉडी कॉकटेल भारतात लाँच केले आहे. कासिरिविमॅब व इमडेविमॅबच्या या अॅण्टिबॉडी कॉकटेलचा पहिला डोस भारतात 60 हजार रुपयांचा असेल. गेल्यावर्षी या अॅण्टिबॉडीने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कोरोनाच्या या उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला होता. विशेषतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या अॅण्टिबॉडीने ज्यांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही अशा सुमारे 70 टक्के लोकांना याचा फायदा होणार आहे.

  दिल्ली : औषध कंपनी रोशे इंडियाने आपली अॅण्टिबॉडी कॉकटेल भारतात लाँच केले आहे. कासिरिविमॅब व इमडेविमॅबच्या या अॅण्टिबॉडी कॉकटेलचा पहिला डोस भारतात 60 हजार रुपयांचा असेल. गेल्यावर्षी या अॅण्टिबॉडीने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कोरोनाच्या या उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला होता. विशेषतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या अॅण्टिबॉडीने ज्यांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही अशा सुमारे 70 टक्के लोकांना याचा फायदा होणार आहे.

  मल्टिडोसची किंमत 1.19 लाख

  रोशो इंडियाने सांगितले की, 1200 एमजीच्या प्रत्येक डोसमध्ये 600 एमजी कासिरिविमॅब व 600 एमजी इमडेविमॅब आहे. प्रत्येक डोसची किंमत 59,750 रुपये उसेल. याच्या मल्टिडोसच्या पॅकेटची कमाल किंमत 1.19 लाख रुपये असेल. एका पॅकने 2 कोरोना संक्रमितांवर उपचार केले जाऊ शकतात. भारतात या अॅण्टिबॉडीचे मार्केटिंग सिपला करत आहे.

  जूनपर्यंत 1 लाख पॅकेट

  रोशे व सिपलाने सांगितले आहे की, औषधाचा पहिला डोस भारतात आला आहे. या औषधाची दुसरी खेप 15 जूनपर्यंत येईल. जूनपर्यंत याचे 1 लाख पॅकेट भारतात असतील व यामुळे सुमारे 2 लाख लोकांना याचा फायदा होईल. हे औषध मोठी रुग्णालये व कोविड सेंटर्सला देण्यात येणार आहेत. सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने काही दिवसांपूर्वीच अॅण्टिबॉडी कॉकटेलच्या इमरजन्सी उपयोगास मंजुरी दिली आहे.

  मुलांनाही देऊ शकतात : डॉ. त्रेहन

  मेदांता हॉस्पिटलच्या डॉ. त्रेहन यांनी सांगितले की, अॅण्टिबॉड कॉकटेल हे औषध काही खास केसेसमध्ये मुलांनाही दिल्या जाऊ शकते. विशेष असे की, याच्या उपयोगामुळे 70% रुग्ण रुग्णालयात दाखल होण्यापासून वाचू शकतात. त्यांनी पुढे सांगितले की, या औषधाचा प्रभाव 70% पर्यंत आहे व यामुळे होणार मृत्यूदर 80% पर्यंत कमी केला जाऊ शकतो. परंतु कंपन्यांनी या औषधाची किंमत कमी करायला हवी, असेही डॉक्टर त्रेहन यांनी सांगितले.