एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी RT-PCRचाचण्यांची गरज नाही, ५ दिवस ताप आला नाही तर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार

देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत सून, १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशआतील नव्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसते आहे. यामुळे केंद्र सरकारने नियमांमध्ये थोडी शिथिलता आणण्यास सुरुवात केली आहे. चाचण्यांबाबतच्या नियमांमध्ये केंद्र सरकारने काही बदल जाहीर केले आहेत.

    नवी दिल्ली : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत सून, १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशआतील नव्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसते आहे. यामुळे केंद्र सरकारने नियमांमध्ये थोडी शिथिलता आणण्यास सुरुवात केली आहे. चाचण्यांबाबतच्या नियमांमध्ये केंद्र सरकारने काही बदल जाहीर केले आहेत.

    नव्या नियमांनुसार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी RT-PCR चाचणी करणे यापुढे गरजेचे नसेल. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्.ने अनेक राज्यांनी, दुसऱ्या राज्यांतून येणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह असणे, बंधनकारक केले होते. आता RT-PCR चाचण्या आणि अहवालाशिवायही एका राज्यतून दुसऱ्या राज्यात प्रवास करणे यामुळे शक्य होणार आहे. यासह नव्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला पाच दिवस ताप नसेल, तर त्याला घरी सोडण्याची परवानगी देण्यात आली असून, अशा स्थितीत RT-PCR चाचणी करण्याची गरज नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

    महाराष्ट्र, उ. प्रदेशसाह १८ राज्यांतील कोरोना रुग्णसंख्या घटली

    देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या स्थितीत सुधारणा होत असून, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, तेलंगाना, चंडीगड, लडाख, दीव-दमण, लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबार या राज्यांतील रुग्णसंख्या झपाट्याने ओसरते आहे. मात्र कर्नाटक, केरळ, तमिलनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा, पंजाब, असाम, जम्मू-कश्मीर, गोवा, हिमाचल प्रदेश, पुद्दुचेरी, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नगालँड, आणि अरुणाचल प्रदेश या भागातील रुग्णसंख्या मात्र सातत्याने वाढताना दिसते आहे. देशातील पॉझिटिव्हिटी रेट सध्या २१ टक्के आहे.