खुशखबर, खुशखबर, खुशखबर ! आता कुठल्याही क्षणी लाखो रुपये ट्रान्सफर करता येणार

सध्या आरटीजीएसची सुविधा मर्यादित वेळेसाठी उपलब्ध केली जाते. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेतच आरटीजीएस सुविधेचा वापर ग्राहकांना करता येतो. त्याचप्रमाणे महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी ही सेवा बंद ठेवली जाते. मात्र यापुढे आठवड्यातील सर्व दिवस आणि २४ तास ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेनं नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मोठ्या रकमेचे ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी वापरण्यात येणारी आरटीजीएस (Real Time Gross Settlement) ही प्रणाली यापुढे २४ तास उपलब्ध असेल, असा निर्णय घेण्यात आलाय.

सध्या आरटीजीएसची सुविधा मर्यादित वेळेसाठी उपलब्ध केली जाते. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेतच आरटीजीएस सुविधेचा वापर ग्राहकांना करता येतो. त्याचप्रमाणे महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी ही सेवा बंद ठेवली जाते. मात्र यापुढे आठवड्यातील सर्व दिवस आणि २४ तास ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

आरटीजीएसचा उपयोग काय?

आरटीजीएस (Real Time Gross Settlement) ही सुविधा मोठ्या रकमांचे ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी वापरण्यात येते. या सुविधेद्वारे एका वेळी किमान २ लाख ते कमाल १० लाख रुपये एका खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात ट्रान्सफर करता येऊ शकतात.

हे व्यवहार प्रत्यक्ष बँकेत जाऊन करणंदेखील शक्य असतं. मात्र त्यासाठी बँकेत जाऊन फॉर्म भरणे, काऊंटरवर त्याची तपासणी होणे आणि काऊंटरवरून पैसे संबंधित खात्यावर जमा होणे, या प्रक्रियेत ग्राहकांचा अधिक वेळ खर्च होतो. त्याऐवजी आरटीजीएस प्रणालीचा वापर करून काही सेकंदात पैशांचे व्यवहार पूर्ण होतात.

सध्या एनईएफटी (National  Electronic Fund Transfer) ही सुविधा २४ तास उपलब्ध आहे. २ लाख रुपयांपेक्षा कमी पैशांचे व्यवहार आरटीजीएस मार्फत करता येत नाहीत. त्यासाठी एनईएफटीचा वापर केला जातो. या सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना कुठल्याही वेळी पैसे ट्रान्सफर करणं शक्य होतं. मात्र आरटीजीएससाठी अशी सुविधा उपलब्ध नव्हती. यापुढे आरटीजीएसदेखील २४ तास उपलब्ध असणार आहे.