Sant Baba Ram Singh, a participant in the farmers' movement, shot himself; Allegations of government atrocities

कृषी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या २० दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला धक्कादायक वळण लागले आहे. या आंदोलनादरम्यान यात सहभागी असलेले संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.

दिल्ली : कृषी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या २० दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला धक्कादायक वळण लागले आहे. या आंदोलनादरम्यान यात सहभागी असलेले संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.

दिल्ली हरयाणा (सिघू) सीमेवरील शेतककरी आंदोलनात ते सहभागी होते. आंदोलनादरम्यानच त्यांनी हत्या केली आहे. बाबा राम सिंह हे करनालमधील रहिवासी होती.

त्यांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोटदेखील समोर आली आहे. सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप त्यांनी या सुसाईड नोटमध्ये केला आहे. शेतकऱ्यांवर अत्याचार होत असल्याचेही त्यांनी नोटमध्ये म्हंटले आहे.

दरम्यान, यापूर्वी मंगळवारीदेखील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. सोमवारी रात्री उशीरा पटियाला जिल्ह्याच्या सफेद गावात एक अपघात झाला होता. त्यामध्ये दिल्लीतील शेतकरी आंदोलनातून परतत असेल्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.