जम्मू-काश्मीरच्या कुलगाम भागात दहशतवाद्यांकडून सरपंचाची गोळ्या घालून हत्या

  • जम्मू - काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यातील वेसूमध्ये घराच्या बाहेरच सज्जाद खांडे यांच्यावर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचाा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कुलगाम – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार करत कुलगाम येथील सरपंचाची हत्या केली आहे. कुलगाम येथील सरपंच सज्जाद खांडे यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या केली आहे. सज्जाद खांडे हे भारतीय जनता पार्टीचे नेते होते. काश्मिरमध्ये नेत्यावर आणि संरपंचावर दहशतवादी गोळीबार करत आहेत. या आधी जून महिन्यात दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडीत सरपंचाची हत्या केली होती. 

जम्मू – काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यातील वेसूमध्ये घराच्या बाहेरच सज्जाद खांडे यांच्यावर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचाा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मिरमध्ये ४ ऑगस्ट २०२० रोजी कुलगाममधील मीरबाजारच्या अखरण भागातील सरपंच पीर आरिफ अहमद शाह यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यात त्यांना गंभीर जखमी केले होते. तसेच बंदीपोरामधील भाजपा नेते अहमद बारी आणि त्यांचे वडील भाऊ यांना देखील गोळ्या घालून ठार करण्यात आले होते.