सौरव गांगुलीच्या छातीत दुखतच नव्हतं, हे होतं खरं कारण

बुधवारी सौरव गांगुली रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं काहीजणांनी सांगितलं. त्यानंतर देशभर ही बातमी पसरली आणि सौरव गांगुली यांची तब्येत पुन्हा बिघडल्याची चर्चा सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर गांगुलींवर उपचार करणाऱ्या ड़ॉक्टरांनी त्यांच्या छातीत दुखत नसल्याचं स्पष्ट केलंय. रुटीन चेकअपसाठी ते आले होते आणि त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि भारताचे माजी कप्तान सौरव गांगुली यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना पुन्हा इस्पितळात दाखल केल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या छातीत दुखत नसून त्यांना केवळ रुटीन चेकअपसाठी दाखल करण्यात आल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केलंय.

बुधवारी सौरव गांगुली रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं काहीजणांनी सांगितलं. त्यानंतर देशभर ही बातमी पसरली आणि सौरव गांगुली यांची तब्येत पुन्हा बिघडल्याची चर्चा सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर गांगुलींवर उपचार करणाऱ्या ड़ॉक्टरांनी त्यांच्या छातीत दुखत नसल्याचं स्पष्ट केलंय. रुटीन चेकअपसाठी ते आले होते आणि त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय.

रुग्णालय प्रशासनानं एक माहितीपत्रक प्रसिद्ध केलं. त्यात दिलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुली हे आपल्या हृदयाच्या रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात आले होते. गेल्यावेळी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ते बरे होऊन घरी परत गेले होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. सध्या त्यांना कुठलाही त्रास होत नाही.

२ जानेवारी  या दिवशी सौरव गांगुलींना हृदयविकाराचा सौम्य धक्का आला होता. घरातील जीममध्ये व्यायाम करताना त्यांच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं होतं. गांगुली यांच्या हृदयात काही गंभीर ब्लॉक होते. त्यांना त्यानंतर स्टेन लावण्यात आला आहे.