हॅट्स ऑफ यू’ म्हणत ‘या’ गायक-कलाकाराने मानले आंदोलक शेतकऱ्यांचे आभार

आमची केंद्र सरकारला केवळ एकच विनंती आहे, की शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा. इथे प्रत्येकजण अत्यंतशांतपणे बसला आणि संपूर्ण देश शेतकऱ्यांच्या सोबत आहे

 

‘हॅट्स ऑफ यू’ , ‘शेतकऱ्यांनी नवीन इतिहास रचला आहे, येणाऱ्या भावी पिढयांना हा इतिहास सांगितला जाईल’ या असे मत गायक-कलाकार दलजीत दोसांज यांनी हरियाणा -दिल्ल्लीच्या सिंघूर सीमेवरील शेतकऱ्यांना संबोधित करताना केले.

आमची केंद्र सरकारला केवळ एकच विनंती आहे, की शेतकऱ्यांच्या(farmers) मागण्या मान्य करा. इथे प्रत्येकजण अत्यंतशांतपणे बसला आणि संपूर्ण देश शेतकऱ्यांच्या सोबत आहे असेही दलजीत म्हणाले.

शेतकरी आंदोलनाबाबत सोशल मीडियावरून(social Media) बेताल वक्तव्य करणाऱ्या कंगणा रणौत दलजीत ट्विटरवरून चांगलाच समाचार घेतला. दलजीत यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले होते. सोशलमीडियावर कंगणा- दलजीत यांचे ट्विटर वॉरही ट्रेंडिंग होते.