kangana ranavat

अभिनेत्री कंगना रणौतने दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी दिलेल्या भारत बंदच्या हाकेची खिल्ली उडवली आहे

 

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौतने ((kangana Ranaut)पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केले आहे.  ‘आओ भारत को बंद कर देते हैं, यूँ तो तूफ़ानों कि कमी नहीं इस नाव को, मगर लाओ कुल्हाड़ी कुछ छेद भी कर देते हैं, रह रह के रोज़ मरती है हर उम्मीद यहाँ, देशभक्तों से कहो अपने लिए देश का एक टुकड़ा अब तुम भी माँग लो, आजाओ सड़क पे और तुम भी धरना दो, चलो आज यह क़िस्सा ही ख़त्म करते हैं’ असे लिहीत दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी दिलेल्या भारत बंदच्या हाकेची खिल्ली उडवली आहे.  या ट्विटबरोबार कंगनाने व्हिडीओ ही पोस्ट केला आहे .

 

मागील ११ दिवसांपासून शेतकऱ्यांचे (farmer) दिल्ली – हरियाणातील सिंघूर सीमेवर आंदोलन(protest) सुरु आहे. देशभरातील लाखो शेतकरी या ठिकाणी जमले आहेत. यापूर्वीही कंगनाने आंदोलनात सहभागी झालेल्या वयोवृद्ध शेतकरी या आंदोलक महिलेला ही  आजी १०० रुपये भाड्याने सर्वत्र  मिळते  असे ट्विट केले आहे. यावरून नेटकऱ्यांनी तिला चांगलेच फटकारले होते. गायक कलाकार दलजितसिंग दोसांझ यांनीही  रणौतला  फटकारले होते.