ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!…असे न केल्यास पैसे अडकणार, SBI कडून विशेष आवाहन

SBI ने आपल्या ४४ कोटी ग्राहकांना ट्विट करून आवाहन केले आहे की, त्यांनी या मुदतीपूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करावे. जर तुम्ही ३० सप्टेंबरपर्यंत हे काम केले नाही, तर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता. पॅन- आधार लिंकिंग आवश्यक आहे, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

  नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी बँक SBI ने आपल्या सर्व ग्राहकांसाठी विशेष आवाहन केलं आहे. सरकारने पॅन कार्डला आधारची लिंक जोडणे आवश्यक केलं असून त्याची मुदत वाढ आता ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही ३० सप्टेंबरपर्यंत हे काम केले नाही, तर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता. अशा प्रकारचं ट्विट SBI बँकेने आपल्या ग्राहकांसाठी केलं आहे.

  पॅन आधारशी लिंक करण्याचा सल्ला

  SBI ने आपल्या ४४ कोटी ग्राहकांना ट्विट करून आवाहन केले आहे की, त्यांनी या मुदतीपूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करावे. जर तुम्ही ३० सप्टेंबरपर्यंत हे काम केले नाही, तर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता. पॅन- आधार लिंकिंग आवश्यक आहे, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी आणि अखंड बँकिंग सेवेचा आनंद घेत राहण्यासाठी आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांचे पॅन आधारशी लिंक करण्याचा सल्ला देतो. असं ट्विटमध्ये म्हटले आहे. 

  पॅन-आधार लिंक करणे आवश्यक

  जर तुम्ही अजून पॅन-आधार लिंक केले नसेल, तर यासाठी आयकर वेबसाईट https://www.incometax.gov.in/iec/foportal/ वर क्लिक करा. येथे आमच्या सेवेमध्ये लिंक आधारचा पर्याय देण्यात आलाय. येथे क्लिक केल्यावर एक नवीन पान उघडेल. यामध्ये दिलेल्या सुचनेनुसार सर्व प्रकारची माहिती भरावी. त्यानंतर  ‘लिंक आधार’ वर क्लिक करा. यानंतर एक पडताळणीसाठी पेज उघडेल. यात आपणास दिसेल की आपला आधार क्रमांक पॅनमधून यशस्वीरित्या लिंक झाला आहे.

  sbi bank has tweeted about pan and aadhaar card link most important to customers nrms