दिल्लीमध्ये ५० टक्के विद्यार्थ्यांसह शाळा लवकरच होणार सुरु, पाळाव्या लागतील ‘या’ सूचना

दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने(DDMA) प्राधिकरणाने सांगितलं की, प्रत्येक वर्गात जास्तीत जास्त ५० टक्के विद्यार्थ्यांना (Schools Reopening In Delhi)त्यांच्या क्षमतेनुसार शाळांमध्ये बोलावता येऊ शकते.

    दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (डीडीएमए)(DDMA) आज महत्त्वाची माहिती दिली आहे. प्राधिकरणाने सांगितलं की प्रत्येक वर्गात जास्तीत जास्त ५० टक्के विद्यार्थ्यांना (Schools Reopening In Delhi)त्यांच्या क्षमतेनुसार शाळांमध्ये बोलावता येऊ शकते. डीडीएमएने म्हटलं आहे की, शाळांनी कोविड -१९ नियमांचे(Covid-19 Rules) पालन करून वर्गाच्या विद्यार्थी क्षमतेनुसार वेळापत्रक तयार केले पाहिजे. कंटेनमेंट झोनमधील विद्यार्थी, शिक्षक यांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये येऊ दिले जाणार नाही, अशी माहितीही दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

    देवाणघेवाण करु नये
    शाळा भरताना आणि सुटताना होणारी गर्दी टाळण्यासाठी, सकाळच्या सत्रात शाळेला आलेल्या विद्यार्थ्यांची शाळा सुटण्याची वेळ आणि दुपारच्या सत्रातल्या विद्यार्थ्यांची शाळा भरण्याची वेळ यात किमान एक तासाचे अंतर असणं आवश्यक आहे, असे मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगण्यात आले आहे.विद्यार्थ्यांनी जेवण, पुस्तके, कागद आणि स्टेशनरी आणि इतर वस्तू एकमेकांना देऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

    हवी पालकांची संमती
    काही दिवसांपूर्वी डीडीएमए समितीने दिल्लीतील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत अहवाल सादर केला होता. तसेच ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याची शिफारस केली होती. यासंदर्भात शुक्रवारी निर्णय घेण्यात आला आणि १ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होऊ शकतात, असा निर्णय घेण्यात आला.इयत्ता ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी १ सप्टेंबरपासून शारीरिक वर्गात उपस्थित राहू शकतात. तर ६वी ते ८ वी चे वर्ग आठवड्यानंतर ऑफलाइन पुन्हा सुरू होऊ शकतात.दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया म्हणाले होते की, विद्यार्थ्यांना ऑफलाइन वर्गात उपस्थितीची सक्ती नसेल. तसेच शाळेत येण्यासाठी पालकांची संमती अनिवार्य असेल.