वैज्ञानिकांचा खुलासा; ‘या’ घरांमध्ये होतोय कोरोना संक्रमणाचा सर्वात जास्त धोका?

  • तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या घरांमध्ये व्हेंटिलेशनची संपूर्ण व्यवस्था नाही, अशा घरांमध्ये कोरोना संक्रमणाचा अधिक धोका आहे. असे दिसून आले. लहान घरांमध्ये हवा मोठ्या प्रमाणात फिरत राहते आणि मोठ्या घरांमध्ये हवेचा प्रवाह कायम आहे. तसेच सूर्यप्रकाश बंद घरात पोहोचत नाही, ज्यामुळे कोरोना विषाणूला वाढण्यास सुरक्षित स्थान मिळते. त्याचप्रमाणे हवेशीर घरांमध्ये कोरोना विषाणू जास्त काळ थांबत नाही आणि हवेच्या प्रवाहाने घराबाहेर पडतो असे सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या संख्यने होत आहे. तसेच देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असून रूग्णांचा आकडा १७ लाखांच्या वर गेला आहे. तसेच हा विषाणू कशाप्रकारे धोकादायक आहे आणि हा विषाणू आटोक्यात कसा येऊ शकतो? याचा शोध वैज्ञानिक घेत आहे. त्याचबरोबर  कोणत्या घरांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका सर्वात जास्त आहे, याबाबत वैज्ञानिकांनी खुलासा केला आहे. 

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या घरांमध्ये व्हेंटिलेशनची संपूर्ण व्यवस्था नाही, अशा घरांमध्ये कोरोना संक्रमणाचा अधिक धोका आहे. असे दिसून आले. लहान घरांमध्ये हवा मोठ्या प्रमाणात फिरत राहते आणि मोठ्या घरांमध्ये हवेचा प्रवाह कायम आहे. तसेच सूर्यप्रकाश बंद घरात पोहोचत नाही, ज्यामुळे कोरोना विषाणूला वाढण्यास सुरक्षित स्थान मिळते. त्याचप्रमाणे हवेशीर घरांमध्ये कोरोना विषाणू जास्त काळ थांबत नाही आणि हवेच्या प्रवाहाने घराबाहेर पडतो असे सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, अमेरिकेच्या मिनेसोटा विद्यापीठानें सादर केलेल्या एका रिपोर्टनुसार, लहान आणि बंद जागांवर कोरोना केवळ अधिक काळ हवेत राहतो त्याचबरोबर ड्रॉपलेट वेगवेगळ्या जागांवर चिटकून राहतात. परंतु कोरोना विषाणूबाबत जगभरातील शास्त्रज्ञांनी वेगवेगळे दावे केल्याचं समोर आलं आहे.