दिल्लीच्या सीमांवरील सुरक्षेत पुन्हा वाढ, ५० हजार शेतकरी दिल्लीत येण्याच्या तयारीत असल्याचा दावा, संघटनांकडून मात्र नकार

दिल्लीत पुन्हा एकदा ५० हजार शेतकरी आंदोलनासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेश आणि हरयाणा या राज्यांना जोडणाऱ्या सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केलीय. मात्र प्रत्यक्षात अशी कुठलीही योजना नसल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलंय. दिल्लीत ५० हजार शेतकरी येतील, ही माहिती चुकीची असून आंदोलनाच्या योजनेत याचा बिलकूल समावेश नसल्याचा खुलासा शेतकरी संघटनांनी केलाय. 

    गेल्या वर्षीपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद अद्यापही दिल्लीत उमटताना दिसत आहेत. केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत आणि एमएसपीबाबतच्या कायद्यात सुधारणा करावी, या मागण्यांसाठी दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. सरकार या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत जिथे असू तिथून हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय.

    दिल्लीत पुन्हा एकदा ५० हजार शेतकरी आंदोलनासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेश आणि हरयाणा या राज्यांना जोडणाऱ्या सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केलीय. मात्र प्रत्यक्षात अशी कुठलीही योजना नसल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलंय. दिल्लीत ५० हजार शेतकरी येतील, ही माहिती चुकीची असून आंदोलनाच्या योजनेत याचा बिलकूल समावेश नसल्याचा खुलासा शेतकरी संघटनांनी केलाय.

    तर एका शेतकरी संघटनेनं पानीपत टोलनाक्यावरून सिंघू बॉर्डरवर यावं, असं आवाहन केल्याची खात्रीशीर माहिती आपल्याला मिळाली असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. या संघटनेच्या शेतकऱ्यांकडे काही फलकही तयार असून त्यात तसा उल्लेख असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

    सध्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या आंदोलनाच्या तिन्ही ठिकाणी पोलीस तैनात असून आपलं कर्तव्य चोख बजावत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. मात्र या नव्या आंदोलनाची माहिती मिळाल्याने आम्ही सुरक्षा अधिक कडक केली आहे, असं पोलिसांनी सांगितलंय.