vaccine corona virus

नवी दिल्ली : कोरोना लशीच्या चाचण्या यशस्वी होत असल्याच्या बातम्या येत असताना ‘कोविडशील्ड’ लशीचा गंभीर साइड-इफेक्ट होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ट्रायल रोखण्यासह पाच कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.

चेन्नईमध्ये झालेल्या कोविडशील्ड (‘Covidshield’ vaccine) लशीच्या ट्रायलमध्ये भाग घेतलेल्या एका व्यक्तीने हा दावा केला आहे.  या लशीची  डोस घेतल्यानंतर त्याच्यावर गंभीर दुष्परिणाम झाला आहे. ज्यामध्ये व्हर्च्युअल न्यूरोलॉजिकल ब्रेकडाउन (neurological breakdown ) सारख्या समस्यांचा समावेश आहे.

ही लस ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि फार्मा कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी तयार केली आहे. या व्यक्तीने सीरम इन्स्टिट्यूट आणि इतरांना पाठविलेल्या  कायदेशीर नोटीस पाठवत नुकसान भरपाईसह ट्रायल रोखण्याची मागणी केली आहे.

ही लस सुरक्षित नसल्याचा आरोप या व्यक्तीने आरोप केला आहे.  या लशीची चौकशी करत उत्पादन आणि वितरण रद्द करण्याची मागणीही या व्यक्तीने केली आहे. या नोटीशीनुसार या लशीच भारतातील ट्रायल पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करीत आहे. सीरम इन्स्टिट्यूटसोबत ही नोटीस आयसीएमआर आणि श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्यकेशन रिसर्चलाही पाठविण्यात आली आहे.

ही लस घेतल्यानंतर मेंदूवर तीव्र परिणाम किंवा आजार झाल्याचा आरोप व्यक्तीने केला असून या लशीमुळे त्याच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याचे विविध चाचण्यांमधुन समोर आले असल्याचे या व्यक्तीचे म्हणणे आहे.

१ ऑक्टोबर रोजी या व्यक्तीला ही लस देण्यात आली होती. लशीचे डोस घेतल्यानंतर मेंदूवर तीव्र एन्सेफॅलोपॅथीचा त्रास झाल्याचे त्या व्यक्तीचे म्हणणे आहे. सध्या होत असलेल्या त्रासामागे कोरोनाच्या ट्रायल कारणीभूत असल्याचे विविध चाचण्यांमधूनही स्पष्ट झाल्याचे व्यक्तीचं म्हणणं आहे. या नोटीसीनुसार ही लस सुरक्षित नाही आणि याचे भागधारक लशीचे परिणाम लपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप या व्यक्तीने केलाय.