A second dose of covishield to volunteers next week in Nair hospital

सीरमची ही लस गंभीर धोका असणाऱ्या आणि गंभीर लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरणार आहे. असे सीरमने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. याआधी अमेरिकेतील औषधनिर्मिती कंपनी फायझरने भारतात लस आयात आणि वितरण करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी भारतीय औषध नियमकांना केली आहे.

दिल्ली : भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना लसीचा आपात्कालीन परिस्थितीत वापर करण्यासाठी परवानगी मागितली आहे. फायझर कंपनीनंतर आता सीरमने ही परवनागी मागितली (Serum seeks permission for emergency use) आहे. यामुळे सीरम ही लसीच्या वापरासाठी अधिकृतता मिळवणारी पहिली भारतीय कंपनी असणार आहे. सीरमने सेंट्रल ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून कोरोना लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी मागितील आहे.

सीरम ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेकाद्वारे विकसित केलेल्या कोविडशिल्डच्या लसीचे भारतामध्ये उत्पादन आणि ट्रायल करत आहे. म्हणून आपात्कालीन परिस्थिती लस वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करत त्यांनी जनतेच्या हिताचा हवाला दिला आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी आणखी मदत होईल असेही सीरमने सांगितले आहे. सीरमच्या या मागणीवर काय निर्णय होतोय याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सीरमची ही लस गंभीर धोका असणाऱ्या आणि गंभीर लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरणार आहे. असे सीरमने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. याआधी अमेरिकेतील औषधनिर्मिती कंपनी फायझरने भारतात लस आयात आणि वितरण करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी भारतीय औषध नियमकांना केली आहे.

सीआयआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविशिल्ड लस चाचणीमध्ये ९० टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे लवकरच ती प्रत्येकासाठी उपलब्ध होईल. यासाठी अ‍ॅस्ट्रॅजेनेकाबरोबर १० कोटी डोसच्या करारावर सह्या झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. यामुळे कोविशिल्डचे तब्बल १०० दशलक्ष डोस हे जानेवारीपर्यंत तर शेकडो दशलक्ष डोस फेब्रुवारीच्या अखेरीस तयार करता येतील अशी माहिती पुनावाला यांनी दिली होती.