प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

भारतातील काही शीख संघटनांना भडकवून सैन्यांनी गाडलेला ‘खलिस्तानी जिन्न’ पुन्हा जिवंत करण्यासाठी अमेरिकेतील ‘शीख फाॅर जस्टिस’(एसएफए) या संघटनेने नवीन डाव रचला आहे. या अंतर्गत आता थेट भारतीय सेनेतील शीख सैनिकांना भडकविण्याचे कारस्थान ‘एसएफए’ या फुटीरतावादी संघटनेेने आखले असल्याचा आरोप भारतातील राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे. यामध्ये एकूण 16 खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांची नावे आहेत.

  • काश्मीरला भारतापासून तोडण्यासाठी ‘एसएफजे’चे उघडपणे समर्थन

दिल्ली (Delhi). भारतातील काही शीख संघटनांना भडकवून सैन्यांनी गाडलेला ‘खलिस्तानी जिन्न’ पुन्हा जिवंत करण्यासाठी अमेरिकेतील ‘शीख फाॅर जस्टिस’(एसएफए) या संघटनेने नवीन डाव रचला आहे. या अंतर्गत आता थेट भारतीय सेनेतील शीख सैनिकांना भडकविण्याचे कारस्थान ‘एसएफए’ या फुटीरतावादी संघटनेेने आखले असल्याचा आरोप भारतातील राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे. यामध्ये एकूण 16 खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांची नावे आहेत.

मुख्य आरोपींमध्ये SFJ चा नेता गुरपतवंत सिंग पन्नून खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंग निज्जर आणि बब्बर खालसा इंटरनॅशनलचा प्रमुख परमजीत सिंग यांची नावे आहेत. काश्मिरी युवकांना कट्टरपंथाकडे नेणं तसंच काश्मीरला भारतापासून वेगळं करण्याचं SFJ जे उघडपणे समर्थन करतं, असं आरोपपत्रात म्हटलं आहे. गुरपतवंत सिंग पन्नू न्यूयॉर्कचा, निज्जर कॅनडाचा तर परमजीत यूकेचा रहिवाशी आहे. जुलै महिन्यात यूएपीए अंतर्गत या चौघांचा दहशतवाद्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

यूएपीए अंतर्गत शीख फॉर जस्टिसवर बंदी असून ही संघटना खलिस्तानी दहशतवादी संघटनांचा चेहरा आहे तसेच पाकिस्तानशी संबंधित आहे, असे एनआयएने म्हटले आहे. फेसबुक, टि्वटर, व्हॉट्स अ‍ॅप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करुन, SFJ स्वतंत्र खलिस्तानच्या उद्दिष्टासाठी शांतता-सौहार्द बिघडवणे, अस्थिरता वाढवण्याचे काम करते असे एनआयएमधील सूत्रांनी सांगितले.