कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर शरद पवार सक्रिय

केंद्र सरकारने (Central Government) कांदा निर्यातबंदीचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा, असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे. यासाठी ते थोड्याचवेळात केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर केंद्र सरकार कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काही उपाययोजना करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

नवी दिल्ली: कांदा निर्यातंबदीचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार (Sharad Pawar) आता सक्रीय झाले आहेत. तसेच या निर्णयानंतर त्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. केंद्र सरकारने (Central Government) कांदा निर्यातबंदीचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा, असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे. यासाठी ते थोड्याचवेळात केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर केंद्र सरकार कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काही उपाययोजना करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

नाशिकमध्ये (Nashik) कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तसेच केंद्र सरकारच्या निर्णयानंतर निर्यातीसाठी पाठवलेला कांदा मुंबई बंदर (Mumbai Port) आणि बांग्लादेशच्या (Bangladesh) सीमेवर अडकून पडला आहे. त्यामुळे आता बाजारपेठेतील कांद्याचे भाव खाली पडण्यास सुरुवात झाली आहे. कांद्याचे भाव २६०० ते २७०० रुपयांपर्यंत खाली कोसळलेत. तर मुंबई बंदरातून निर्यातीसाठी निघालेला ४०० कंटेनर कांदा सडण्याची भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान, कांदा निर्यातबंदी हा शेतकऱ्यांशी केलेला विश्वासघात असल्याची प्रतिक्रिया किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले ( Ajit Navale) यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकरी संघटना आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत.