पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची दिल्लीत भेट; सहकार खात्याकडून असलेल्या अपेक्षा आणि बँकिंग संदर्भातील चर्चा?

या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर खलबतं झाली. या भेटीचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. मात्र, नव्याने निर्माण करण्यात आलेलं सहकार खातं, महाराष्ट्रातील आणि देशातील सहकाराचे प्रश्न, सहकार खात्याकडून असलेल्या अपेक्षा आणि बँकिंग संदर्भातील विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

    नवी दिल्ली – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली आहे. या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा सुरू असून ही चर्चा नेमकी कोणत्या मुद्द्यांवर झाली हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. परंतु पवार आणि मोदी यांच्या भेटीनंतर राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आलं आहे.

    दरम्यान, यावेळी केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राजनाथ सिंह यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी पीएमओमध्ये गेले.

    या भेटीत दोन नेत्यांमध्ये तब्बल तासभर खलबतं झाली. या भेटीचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. मात्र, नव्याने निर्माण करण्यात आलेलं सहकार खातं, महाराष्ट्रातील आणि देशातील सहकाराचे प्रश्न, सहकार खात्याकडून असलेल्या अपेक्षा आणि बँकिंग संदर्भातील विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

    गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा विरोधकांकडून केली जात आहे. आणि याच पार्श्वभूमीवर काल (दि. १६) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर आज शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.