ऐतिहासिक घटना, शरद पवार घेणार सोनिया गांधींची जागा? युपीएच्या अध्यक्षपदी शरद पवारांच्या नावाची चर्चा

युपीएतील सर्व पक्षांची मोट बांधून भाजपच्या विरोधात संघर्ष करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जातंय. शरद पवार हे देशव्यापी संपर्क असलेलं अनुभवी आणि चाणाक्ष व्यक्तीमत्व आहे. युपीएतील सर्व घटकपक्षांना बांधून ठेवण्याचं कसब पवारांकडे आहे. युपीएतील सर्व घटकपक्षांसोबत शरद पवारांचे अत्यंत सलोख्याचे आणि जिवाळ्याचे संबंध आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी येण्याची दाट शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून हे पद आहे. मात्र आता युपीएच्या भावी वाटचालीसाठी शरद पवारांकडे हे पद जाण्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू असल्याची बातमी सध्या दिल्लीमध्ये चर्चिली जातेय.

युपीएतील सर्व पक्षांची मोट बांधून भाजपच्या विरोधात संघर्ष करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जातंय. शरद पवार हे देशव्यापी संपर्क असलेलं अनुभवी आणि चाणाक्ष व्यक्तीमत्व आहे. युपीएतील सर्व घटकपक्षांना बांधून ठेवण्याचं कसब पवारांकडे आहे. युपीएतील सर्व घटकपक्षांसोबत शरद पवारांचे अत्यंत सलोख्याचे आणि जिवाळ्याचे संबंध आहेत.

सध्या मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असताना सर्व विरोधी पक्ष या आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र आल्याचं चित्र आहे. या सर्व पक्षांना भविष्यात एकत्र ठेवण्यासाठी शरद पवार हा उत्तम दुवा असल्यावर युपीएतील सर्व घटक पक्षांची संमती झाल्याचंही समजतंय. स्वतः शरद पवारांनीही ही जबाबदारी स्विकारायला तयारी दाखवल्याची माहितीदेखील सूत्रांकडून मिळते आहे.

नुकतंच राष्ट्रपतींकडे कृषी कायद्यांबाबतचं निवेदन देण्यासाठी गेलेलं विविध पक्षांचं शिष्टमंडळ हे पवारांच्या नेतृत्वाखालीच गेलं होतं. पवारांच्या निवडीमुळं देशात महाराष्ट्र पॅटर्न तयार होण्याची शक्यता वर्तवली जातेय. देशाच्या राजकीय इतिहासातील ही सर्वात मोठी घटना ठरू शकते.