no instructions give notice sharad pawar election commission clears

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाला पाठिंबा देताच भाजपने शरद पवार हे कृषीमंत्री असतानाचे एक पत्र व्हायरल केले आहे. यावरुन भाजप नेते राजकारण करत असताना स्वत: शरद पवार यांनी या पत्राचा खुलासा केला आहे.

युपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषीमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करत अनेक राज्यांना हे पत्र लिहिलं होतं. यावरुन भाजपचे अनेक नेते शरद पवारांवर टीका करत आहेत. दरम्यान दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी यावर भाष्य केलं.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेण्यासाठी शरद पवार दिल्लीत पोहोचले होते. पुरंदर विमानतळाच्या जमीन अधीग्रहणासंदर्भात यावेळी चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पत्राबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी याबाबत खुलासा केला.

ज्यांनी पत्राचा हवाला दिला आहे त्यांनी ते थोडं नीट वाचलं असतं तर त्यांचा वेळ वाचला असता. कायद्यातील सुधारणांसंदर्भात पत्र लिहिलं होतं यामध्ये कोणतंही दुमत नाही. पण आज जे तीन नवे कृषी विधेयक आणले आहेत त्यात याचा उल्लेख दिसत नाही अस स्पष्टीकरण शरद पवारांनी या  पत्राबाबत दिले आहे.

विषय भरकटवण्यासाठी हे सगळ केलं जात असल्याचाही आरोपही शरद पवार यांनी यावेळी  केला. याला जास्त महत्व देऊ नका असंही ते म्हणाले.