Shipping companies raise fares, not containers to ship goods; The difficulties of the professionals increased

फेब्रुवारीच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, मागील वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत निर्यातीत 0.25 टक्क्यांनी घट झाली. निर्यातकांनी सांगितले की, चीन 90 टक्के कंटेनर तयार करते. मात्र भारतात कंटेनरची निर्मिती होत नाही. कंटेनरनिर्मितीसाठी इतर देशांवर भारताला अवलंबून राहावे लागत आहे. तुटवडयामुळे कंटेनरच्या भाडे वाढले आहे. शिपिंग कंपन्यांनी कंटेनरचे भाडे वाढविल्याने मिळणाऱ्या उत्पन्नात घट होत आहे. विदेशातून मिळणाऱ्या ऑर्डरची कमतरता नसून कंटेनरची मोठी समस्या भेडसावत आहे.

    दिल्ली : भारतातील उत्पादनांची मागणी जगात वाढत आहे. निर्यातीत सुध्दा मागीलवर्षीच्या तुलनेत 6.16 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. मात्र मागील चार महिन्यांपासून देशात कंटेनरचा तुटवडा असल्याने निर्यातदारांना विदेशात वस्तूचा पुरवठा वेळेवर करता येत नाही. केंद्राकडे याबाबत निर्यातदारांनी अनेकदा तक्रार केली. मात्र. तोडगा काढण्यात अपयश आल्याने व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या आहे.

    वेहेवर वस्तूचा पुरवठा होत नसल्याने ऑर्डर स्थगित करण्याचे प्रमाण वाढत आहे. पर्यायाने निर्यातीला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निर्यातदारांच्या म्हणण्यानुसार त्यांना सध्या सर्व ठिकाणाहून चांगले ऑर्डर मिळत आहेत. गेल्या दोन महिन्यांतील आकडेवारीही भारतीय निर्यातीसाठी चांगली चिन्हे दर्शवित आहे. यावर्षी जानेवारीत वस्तूंच्या निर्यातीत मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 6.16 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

    फेब्रुवारीच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, मागील वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत निर्यातीत 0.25 टक्क्यांनी घट झाली. निर्यातकांनी सांगितले की, चीन 90 टक्के कंटेनर तयार करते. मात्र भारतात कंटेनरची निर्मिती होत नाही. कंटेनरनिर्मितीसाठी इतर देशांवर भारताला अवलंबून राहावे लागत आहे. तुटवडयामुळे कंटेनरच्या भाडे वाढले आहे. शिपिंग कंपन्यांनी कंटेनरचे भाडे वाढविल्याने मिळणाऱ्या उत्पन्नात घट होत आहे. विदेशातून मिळणाऱ्या ऑर्डरची कमतरता नसून कंटेनरची मोठी समस्या भेडसावत आहे.

    कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने भेल व ब्रेथवेटला कंटेनर निर्मितीसाठी ऑर्डर दिले आहे. ऑर्डरची पुर्तता करण्यासाठी आणखी महिनाभराचा कालावणी लागू शकतो. कंटेनर निर्मितीत भारताला सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. निर्यातदारांची समस्या स्वाभाविक आहे. मात्र शिपिंग कंपन्यांशी बोलणी करून भाडेदराबाबत चर्चा केली जाईल असे कॉनकोरचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक  व्ही. कल्याण रामा यांनी सांगीतले.