Shocking revelations in deforestation research; Loss of one tree per capita in India

श्रीमंत देशांमध्ये कॉफीपासून सोयाबीनपर्यंतच्या वस्तूंची मागणी वाढल्यामुळे उष्णकटिबंधीय भागांतील जंगलांमध्ये झाडांच्या कत्तलीचे प्रमाण वाढतच चालले आहे. दिलासादायक बाब म्हणजे, वृक्षतोडीच्या प्रमाणात विकसित देशात झाडांची संख्याहीवाढत चालल्याचा खुलासा संशोधनातून झाला आहे. मात्र, वृक्षतोडीशी संबंधित उत्पादनांची आयात हे प्रयत्न कमकुवत करणारी ठरत आहे. हे संशोधन ‘नेचर इकॉलॉजी अँड इवॉल्यूशन’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. भारत आणि चीनसारख्या देशांमध्येही वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, सध्या श्रीमंत देशांच्या तुलनेत ते कमी आहे. आकडेवारीनुसार, भारत आणि चीनमध्ये दरवर्षी एका ग्राहकामुळे एका झाडाचे नुकसान होत आहे. तर, श्रीमंत देशांमध्ये प्रत्येकी एक ग्राहक चार झाडांच्या कत्तलीसाठी जबाबदार ठरतो आहे.

  दिल्ली : भारतात वृक्ष लावा आणि वृक्ष जगवा यासह इतर अनेक वृक्षलागवड योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. मात्र, त्याचा हवा तसा परिणाम होत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भारतासह संपूर्ण जगात जंगलातील झाडांची सर्रास कत्तल सुरूच आहे. एका संशोधनानुसार, ब्रिटेन आणि इतर श्रीमंत देशांमध्ये दरवर्षी प्रतिव्यक्ती चार झाडे कमी होत चालली आहे, तर भारतात प्रतिव्यक्ती एका झाडाचे नुकसान होत आहे.

  अवैध कत्तलीचे प्रमाण वाढले

  श्रीमंत देशांमध्ये कॉफीपासून सोयाबीनपर्यंतच्या वस्तूंची मागणी वाढल्यामुळे उष्णकटिबंधीय भागांतील जंगलांमध्ये झाडांच्या कत्तलीचे प्रमाण वाढतच चालले आहे. दिलासादायक बाब म्हणजे, वृक्षतोडीच्या प्रमाणात विकसित देशात झाडांची संख्याहीवाढत चालल्याचा खुलासा संशोधनातून झाला आहे. मात्र, वृक्षतोडीशी संबंधित उत्पादनांची आयात हे प्रयत्न कमकुवत करणारी ठरत आहे. हे संशोधन ‘नेचर इकॉलॉजी अँड इवॉल्यूशन’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. भारत आणि चीनसारख्या देशांमध्येही वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, सध्या श्रीमंत देशांच्या तुलनेत ते कमी आहे. आकडेवारीनुसार, भारत आणि चीनमध्ये दरवर्षी एका ग्राहकामुळे एका झाडाचे नुकसान होत आहे. तर, श्रीमंत देशांमध्ये प्रत्येकी एक ग्राहक चार झाडांच्या कत्तलीसाठी जबाबदार ठरतो आहे.

  हवामान, जैवविविधतेसाठी हानिकारक

  जंगलातील वृक्षतोड हवामान आणि जैवविविधतेसाठी फार हानिकारक ठरत असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. उष्णकटिबंधीय भागात वाढणाऱ्या झाडांच्या प्रजातींचे संरक्षण करणे आणि जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी जंगल उपयुक्त मानले जाते. उष्णकटिबंधीय वन 50 ते 90 टक्के विविध वनस्पती आणि प्राण्यांचे घर आहे. अहवालानुसार, जगभरात उष्णकटिबंधीय जंगलांची सर्वाधिक कत्तल ब्राझीलमध्ये केली जात आहे. जगातील एकूण दहा देशांमध्ये 4.2 मिलियन हेक्टर उष्णकटिबंधीय जंगलांची कत्तल सुरू आहे. ग्लोबल फॉरेस्ट वॉचनुसार, यात ब्राझीलसह कांगो, बोलिबिया, इंडोनेशिया, पेरू, कोलंबिया, कॅमरून, लाओस, मलेशिया आणि मॅक्सिको या देशांचा समावेश आहे.

  बीफ उत्पादन कारणीभूत

  आवर वर्ल्ड इन डाटामध्ये प्रकाशित अहवालानुसार, दरवर्षी जंगलांच्या एक तृतियांश भागाची शेतीसाठी कत्तल केली जाते. जगातील वाढती लोकसंख्या आणि त्यांच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जंगल उध्वस्त करून त्याचे रूपांतर शेतीत केले जात आहे. मात्र, जंगलातील वृक्षतोडीसाठी बीफ उत्पादन हे सर्वाधिक जबाबदार आहे. 41 टक्के जंगल यासाठीच नष्ट केले जात आहे. म्हणजेच सुमारे 2.1 मिलियन हेक्टर जंगलाची दरवर्षी कत्तल केली जात आहे. याचबरोबर, तेल बियाणे आणि सोयाबीन उत्पादनामुळेदेखील 18 टक्के जंगलांची कापणी केली जात आहे. बीफ आणि तेलबियामुळे सुमारे 60 टक्के वृक्ष तोडले जात आहे. कागद आणि लाखूडसंबंधीत उद्योगांमुळे 13 टक्के जंगल नष्ट केले जात आहे.