ऑक्सिजन पुरवठादार कंपन्यांची शेअर मार्केटमध्ये चांदी

 नॅशनल ऑक्सिजन, भगवती ऑक्सिजन, लिन्डे इंडिया आणि गगन गॅसेस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा तुटवडा आहे.

    नवी दिल्ली : देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तर महाराष्ट्र आणि इतर प्रमुख राज्यांत ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याचा फायदा आता ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना झाला असून शेअर मार्केटमध्ये त्यांची चांदी झाल्याचं दिसून येतंय.

    नॅशनल ऑक्सिजन, भगवती ऑक्सिजन, लिन्डे इंडिया आणि गगन गॅसेस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा तुटवडा आहे.

    त्यामुळे या कंपन्यांना जास्तीच्या ऑक्सिजनची निर्मिती करण्यास केंद्राने मुभा दिली आहे. त्याचा परिणाम म्हणजे या दोन महिन्यांच्या काळात संबंधित कंपन्यांच्या भावात वाढ झाली आहे. अनेक गुंतवणूकदारांनी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे.