रिचर्ड ब्रॅन्सनबरोबर अंतराळात भारतीय वंशाची सिरिशा बांडलाही जाणार, अंतराळात जाणारी तिसरी भारतीय वंशाची महिला ; जाणून घ्या

भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे की, जेव्हा युकेचे अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सनची कंपनी Virgin Galatic चे SpaceShipTwo Unity अंतराळासाठीचा प्रवास सुरू करेल, तेव्हा सिरीशा बांडलादेखील यात सामील होतील. सिरीशापूर्वी कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांनी ही कामगिरी केली आहे.

    नवी दिल्ली – भारतीय वंशाची सिरिशा बांडला (Sirisha Bandla) एक नवा इतिहास रचण्यास तयार झाली आहे. मुळची आंध्र प्रदेशमधील असलेली सिरिशा अंतराळ प्रवास करणार आहे. परड्यू युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलेल्या-३४ वर्षीय भारतीय वंशाच्या एरोनॉटिकल इंजिनीअर सिरीशा बांडला आता अंतराळात जाणारी तिसरी भारतीय महिला म्हणून ओळखली जाईल.

    भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे की, जेव्हा युकेचे अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सनची कंपनी Virgin Galatic चे SpaceShipTwo Unity अंतराळासाठीचा प्रवास सुरू करेल, तेव्हा सिरीशा बांडलादेखील यात सामील होतील. सिरीशापूर्वी कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांनी ही कामगिरी केली आहे. अमेरिकेची खासगी अंतराळ संस्था व्हर्जिन गैलेक्टिकचे (Virgin Galactic) सर रिचर्ड ब्रेनसन ( Sir Richard Branson) यांच्यासोबत सहा जण अंतराळ प्रवास करणार आहेत. त्यामध्ये सिरिशा बांडलाचा देखील समावेश आहे.

    सिरीशा म्हणाली, मी युनिटीच्या शानदार क्रू आणि सर्वांना अंतराळयात्रेसाठी संधी उपलब्ध करुन देण्याचे काम करत असलेल्या कंपनीचा भाग असल्याचा मला आनंद झाला आहे. ती पुढे म्हणाली की, याद्वारे वेगवेगळी पार्श्वभूमी, वेगवेगळे प्रदेश आणि वेगवेगळे समुदाय अंतराळात नेण्यासाठी खूप चांगली संधी आहे.

    सिरीशाला अंतराळवीर व्हायचे होते

    अमेरिकेतून भारतात आल्यानंतर सिरीशाने आपले बालपण ह्यूस्टनमधील नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरजवळ घालवले आणि नेहमीच अंतराळवीर व्हावे अशी तिची इच्छा होती. तथापि, दृष्टी कमी असल्याने ती पायलट किंवा अंतराळवीर होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकली नाही. तिने परड्यू युनिव्हर्सिटीमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केले आहे.