गाढ झोपा आणि लखपती बना! 9 तास झोपण्यासाठी 10 लाख रुपये

10 लाख रुपयांचे बक्षीस मिळवण्यासाठी तुम्हाला सलग 100 रात्री दररोज 9 तास गाढ झोप घ्यावी लागेल. हे काम प्रत्येक रात्री करावे लागेल. तसेच हेच सहभागी उमेदवारांचे काम असेल. स्पर्धकांना दररोज वेळेवर येऊन झोपावे लागेल. झोपण्यासाठी उमेदवारांना वेकफिटची गादी आणि एक उत्तम स्लीप ट्रॅकर दिला जाईल. तुमच्या झोपेचे कंपनीकडून निरीक्षण केले जाईल. ही झोप गाढ असली पाहिजे. त्यासाठी कंपनीकडून सर्व सुविधा दिल्या जातील.

  दिल्ली : सहज आणि झटपट पैसे मिळत असतील तर त्याला कोण नाही म्हणणार? त्यातही काही खास काम न करता पैसे मिळत असतील तर… पैसे कमविण्यासाठी केवळ झोपण्यास सांगितले गेले, म्हणजेच तुम्हाला आरामात झोपण्याच्या मोबदल्यात पैसे मिळवण्याची संधी मिळाली तर त्यापेक्षा चांगले काय असू शकते. आता एका कंपनीने अशी संधी उपलब्ध करून दिली आहे. जर तुम्हालाही झोप आवडत असेल तर तुम्हीही या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करू शकता.

  बंगळुरूमधील स्लीप अँड हाऊस सॉल्युशन कंपनी वेकफिट दरवर्षी असा एक कार्यक्रम आयोजित करते ज्यामध्ये लोकांना चांगली झोप घेण्यासाठी नियुक्त केले जाते. त्याबदल्यात अशा लोकांना दहा लाख रुपये दिले जातात. या कंपनीकडून एक स्लीप इंटर्नशिप कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यामध्ये निवड झालेल्या स्लीप इंटर्न्सना लाखो रुपये कमाविण्याची संधी दिली जाते.

  60 हजारांहून अधिकांनी केले अर्ज

  कंपनीच्या या वार्षिक स्लीप इंटर्नशिप कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनसाठी आतापर्यंत 60 हजारांहून अधिक लोकांनी अर्ज केले आहेत. यामध्ये जिंकणाऱ्या व्यक्तीला 10 लाख रुपये मिळतील तर इंटर्नमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्याला 1 लाख रुपये मिळतील. विजेत्याला दहा लाख रुपयांच्या बक्षिसासह इंडियाज स्लीप चॅम्पियन हा पुरस्कार मिळेल.

  असे असेल काम

  10 लाख रुपयांचे बक्षीस मिळवण्यासाठी तुम्हाला सलग 100 रात्री दररोज 9 तास गाढ झोप घ्यावी लागेल. हे काम प्रत्येक रात्री करावे लागेल. तसेच हेच सहभागी उमेदवारांचे काम असेल. स्पर्धकांना दररोज वेळेवर येऊन झोपावे लागेल. झोपण्यासाठी उमेदवारांना वेकफिटची गादी आणि एक उत्तम स्लीप ट्रॅकर दिला जाईल. तुमच्या झोपेचे कंपनीकडून निरीक्षण केले जाईल. ही झोप गाढ असली पाहिजे. त्यासाठी कंपनीकडून सर्व सुविधा दिल्या जातील.

  का करतात आयोजन?

  वेकफिटच्या को-फाऊंडरांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या काळात लोकांचे दैनंदिन जीवनमान बदलले आहे. तसेच झोपेची समस्या सर्वसामान्य झाली आहे. 2020 मध्ये आलेल्या कोरोनाच्या साथीमुळे तणाव आणि वर्क फ्रॉम होममुळे उशिराने झोपणे बाधित झालेला झोपेचा पॅटर्न आणि कमी झोपेची समस्या पाहता कंपनी शांतपणे झोप मिळण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करत असते.