Want a job then quit smoking and tobacco

धुम्रपान अर्थात स्मोकिंग करुन आपल्या फुफ्फुसांना नुकसान पोहचवणाऱ्या लोकांमध्ये कोरोनाची गंभीरता आणि यामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण ५० टक्के अधिक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एका रिपोर्टमध्ये सांगितलं. WHO चे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस यांनी जारी केलेल्या एका प्रसिद्धीनुसार, धुम्रपान करणाऱ्यांना हा इशारा देण्यात आला आहे.

  नवी दिल्ली: कोरोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक परिणाम नागरिकांच्या रोग प्रतिकार शक्तीवर होतोय. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींमध्ये सर्वाधिक त्रास हा जाड व्यक्ती व धूम्रपानाचे व्यसन असलेल्या व्यक्तीना होताना समोर आले आहे. ध्रुमपानाच्या सवयीमुळे अनेक कोरोना बाधितांची फुफ्फुसे आधीच कमजोर झालेली असल्यामुळे कोरोनाच्या विषाणूंचा वेगाने परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. इतकच नव्हे तर कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत ५० टक्के मृत्यू हे धुम्रपानचे व्यसन असणाऱ्या लोकांचा झाला असल्याचे डब्लूएचओने म्हटले आहे.

  ध्रुमपान करणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा धोका अधिक
  धुम्रपान अर्थात स्मोकिंग करुन आपल्या फुफ्फुसांना नुकसान पोहचवणाऱ्या लोकांमध्ये कोरोनाची गंभीरता आणि यामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण ५० टक्के अधिक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एका रिपोर्टमध्ये सांगितलं. WHO चे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस यांनी जारी केलेल्या एका प्रसिद्धीनुसार, धुम्रपान करणाऱ्यांना हा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका टाळायचे असले तर धूम्रपान कमी नागरिकांना फायद्याचे ठरणार आहे. तसेच स्मोकिंग बंद केल्यामुळे कॅन्सर, हृदयरोग आणि श्वासासंबंधी आजारांची जोखीमही कमी होणार आहे. मात्र एकदम धूम्रपानाचे व्यसन सोडणे कुणालाच शक्य नाही. अश्यावेळी

  ‘या’ उपायांची करा अंमलबजावणी करा.

  – एका वेळी सिगरेटचे पाकीट खरेदी करण्याऐवजी एकच सिगरेट खरेदी करा.
  – एकाच वेळी संपूर्ण सिगरेट पिण्याऐवजी ती अर्धीच सोडून द्यायची सवय लावा.
  – हळू-हळू सिगरेट सोडण्यासाठी एक तारीख निश्चित करा.
  – आठवड्याच्या सुरुवातीला एक दिवस न पिण्याची सवय लावा.
  – त्यानंतर एक दिवसाआड धूम्रपान करा.
  – हळू हळू दोन-तीन दिवसानंतर धूम्रपान करा जेणेंकरू सिगारेट पिण्याची सवय कमी होईल.
  कोणतीही गोष्ट एकाच फटक्यात होणं शक्य नाही, परंतु यासाठी केलेली सुरुवातचं तुमचं ध्येय गाठण्यास मदतशीर ठरेल.