Dont get me wrong Asaduddin Owaisis criticism of Sarsanghchalak Mohan Bhagwat
दिशाभूल करू नका, असदुद्दीन ओवेसींची सरसंघचालक मोहन भागवतांवर टीका

चीनचे सैन्य भारताच्या हद्दीत घुसून बसले आहेत, हे खरे देशभक्त या नात्याने भागवत यांनी मान्य करावे, असे ओवैसी म्हणाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारसरणी संघाची आहे, ते चीन विरोधात चकार काढायलाही घाबरतात. त्यामुळे जर भागवत हे खरे देशभक्त आहेत तर, त्यांनी सर्वांसमोर येऊन चीनी सैन्याने भारतात घुसखोरी हे मान्य करावे, असे आव्हान त्यांनी भागवतांना दिले.

    दिल्ली : नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची खरमरीत टीका खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर केली. याचबरोबर, तुम्हीच खरे देशभक्त, असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावरही निशाणा साधला. भारताने आत्मनिर्भर व्हावे, असे मोहन भागवतांनी म्हटले होते. यावरून त्यांनी भागवतांना सुनावले.

    चीनचे सैन्य भारताच्या हद्दीत घुसून बसले आहेत, हे खरे देशभक्त या नात्याने भागवत यांनी मान्य करावे, असे ओवैसी म्हणाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारसरणी संघाची आहे, ते चीन विरोधात चकार काढायलाही घाबरतात. त्यामुळे जर भागवत हे खरे देशभक्त आहेत तर, त्यांनी सर्वांसमोर येऊन चीनी सैन्याने भारतात घुसखोरी हे मान्य करावे, असे आव्हान त्यांनी भागवतांना दिले.

    मोहन भागवत म्हणतात की कोणत्याच गोष्टीसाठी आपण चीनवर विसंबून राहायला नको. मग भारतात नोटाबंदी करून देशाची अर्थव्यवस्था कोणी उद्ध्वस्त केली?, देशातील आर्थिक स्थितीला कोण जबाबदार आहे?, केवळ आणि केवळ मोदी सरकार जबाबदार आहे. कोरोना महामारीत मोदी सरकारने जनतेसाठी आणलेल्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. भागवत तुम्हाला देशातील जनतेची ही स्थिती बघवत आहे का, असा सवाल करत त्यांचे विधान बोगस आहे, अशी टीका ओवैसींनी केली.