….तर थोडी चूकही कोरोनाची परिस्थिती करेल गंभीर ; तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती

अद्यापही दुसरी लाट संपलेली नाही. आता सण उत्सव येत आहेत. अशात मोठ्या संख्येत लोकांनी जमा होऊ नये. आजही मोठी लोकसंख्या कोरोना संसर्गापासून सुरक्षित आहे.त्यामुळे सर्वांनी घरच्याघरी साधेपणाणेच सण उत्सव साजरे करावेत.

    नवी दिल्ली: कोरोनाची तिसरी लाट (The third wave of corona)येण्याची शक्यता सातत्याने तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. अशातच गणेशोत्सव(Ganeshotsav)व आगामी सण-उत्सावाला जमणाऱ्या गर्दीवरून कोरोनाची परिस्थिती आणखी गंभीर होईल अशी भीती तज्ञ व्यक्त करत आहेत. जर आपण आता थोडीशी जरी चूक केली तरी सध्या नियंत्रणात असलेला संसर्ग पुन्हा भयावह रूप धारण करू शकतो. यामुळे, सगळे कष्ट व्यर्थ जातील, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल(Member of the Policy Commission Dr. V. K. Paul) म्हणाले.

    महिलांच्या लसीकरणाचा आकडा आमच्या अपेक्षेपेक्षा फार कमी आहे. गर्भवती महिलांसाठी कोरोना लस अत्यंत महत्वाची आहे. ज्यांनी ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांनी दुसरा डोस देखील वेळेत घ्यावा, असंही पॉल म्हणालेत.

    दरम्यान, अद्यापही दुसरी लाट संपलेली नाही. आता सण उत्सव येत आहेत. अशात मोठ्या संख्येत लोकांनी जमा होऊ नये. आजही मोठी लोकसंख्या कोरोना संसर्गापासून सुरक्षित आहे.त्यामुळे सर्वांनी घरच्याघरी साधेपणाणेच सण उत्सव साजरे करावेत असा सल्लाही पॉल यांनी दिलाय.