…तर टोल न भरताच वाहनांना जाण्यास परवानगी; ‘वेटिंग टाईम’बाबत नवा नियम

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचआय) राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या टोल प्लाझावर आता प्रति वाहन 10 सेकंद सर्व्हिस टाईम निश्चित करण्यासाठी निर्देश जारी केले आहेत. विशेष म्हणजे टोल प्लाझावर १०० मीटर पेक्षा अधिक लांबीची रांग असेल तर वाहने टोल न भरता जाऊ शकतील असेही स्पष्ट केले आहे. १०० मीटर पेक्षा अधिक लांब रांग असेल तर वाहनांना विना टोल परवानगी दिली जावी, असेही नव्या आदेशात नमूद आहे. या निर्णयामागील मुख्य उद्देश वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्याचा आहे.

    दिल्ली : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचआय) राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या टोल प्लाझावर आता प्रति वाहन १० सेकंद सर्व्हिस टाईम निश्चित करण्यासाठी निर्देश जारी केले आहेत. विशेष म्हणजे टोल प्लाझावर १०० मीटर पेक्षा अधिक लांबीची रांग असेल तर वाहने टोल न भरता जाऊ शकतील असेही स्पष्ट केले आहे. १०० मीटर पेक्षा अधिक लांब रांग असेल तर वाहनांना विना टोल परवानगी दिली जावी, असेही नव्या आदेशात नमूद आहे. या निर्णयामागील मुख्य उद्देश वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्याचा आहे.

    पिवळी रेषाही आखणार

    सर्व वाहनांना फास्ट टॅग बंधनकारक केल्यामुळे टोल प्लाझावरील वेटिंग टाईम कमी झाला आहे. पण काही कारणांमुळे जर रांग वाढली तर १०० मीटर परिघात एक पिवळी रेष आखली जाईल. या रेषेच्या आत असलेल्या वाहनांना टोल द्यावा लागेल परंतु जर वाहन या रेषेच्या बाहेर निघाले तर मात्र त्यांना टोल न देताच पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल.

    वेळेची बचत होणार

    केवळ १० सेकंदच कमीत कमी वेळ असल्याने आता वाहनांना थांबावेही लागणार नाही. जर ते १० सेकंदपेक्षा जास्त वेळ वाहने उभी राहिल्यास वाहनांची रांग बरीच वाढण्याचीही शक्यता आहे. या नव्या सुविधेमुळे आता टोल प्लाझावरून जाणाऱ्या वाहनांचाही त्रास कमी होणार आहे व यामुळे वेळेचीही बचत होईल.