कोरोनात मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांसाठी टाटा स्टीलची ‘सामाजिक सुरक्षा योजना’ ; ‘या’ सुविधा देणार

या योजनेअंतर्गत, कंपनीच्या कोणत्याही कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कंपनी त्या कर्मचार्‍याच्या कुटुंबास ६० वर्षे पगार देणार असल्याचे जाहीर केले आहे. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतरही कुटूंबाला राहण्यासाठी क्वार्टर देण्यात येणार असून त्याबरोबर वैद्यकीय सुविधादेखील देण्यात येणार आहे. इतकेच नाही तर मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही कंपनी उचलणार आहे.

    नवी दिल्ली:कोरोनाच्या साथीत अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. इतकेच नव्हे तर अनेक कुटुंबातील कमावती माणसेच कोरोनाने हिरावून नेल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. मात्र या प्रकारे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबियांना सावरण्यासाठी टाटा स्टील (Tata Steel) पुढे सरसावली आहे, कंपनीने कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आणिक त्यांच्या कुटुंबियांसाठी सामॅजिक सुरक्षा योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत, कंपनीच्या कोणत्याही कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कंपनी त्या कर्मचार्‍याच्या कुटुंबास ६० वर्षे पगार देणार असल्याचे जाहीर केले आहे.

    कंपनीने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक परिपत्रक जारी केले आहे, ज्यामध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. कंपनीने एका ट्वीटमध्ये लिहिले आहे की,’टाटास्टीलने आमचे काम करीत असताना COVID19मुळे प्रभावित कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी सामाजिक सुरक्षा योजनांचा विस्तार करुन AgilityWithCare चा मार्ग स्वीकारला आहे आणि आपल्या सर्वांना या कठीण काळातून बाहेर येण्याचे आवाहन केले आहे.

    ‘या’ योजनेअंर्तगत सुविधा मिळणार

    पगाराची रक्कम मृत कर्मचार्‍याच्या शेवटच्या पगाराइतकी असेल, मृत कर्मचारी / नॉमिनी व्यक्तीचे वय ६० वर्षे पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीसाठी वेतन देण्यात येईल.

    सर्व वैद्यकीय लाभ मृतांच्या कुटुंबीयांना देण्यात येतील, याशिवाय त्यांना घरांच्या सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत,
    कर्मचार्‍यांच्या मुलांच्या पदवीपर्यंत होईपर्यंत शिक्षाणाची खर्च कंपनी करणार आहे

    कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतरही कुटूंबाला राहण्यासाठी क्वार्टर देण्यात येणार असून त्याबरोबर वैद्यकीय सुविधादेखील देण्यात येणार आहे. इतकेच नाही तर मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही कंपनी उचलणार आहे.