काँग्रेसमध्ये जी-२३च्या वादावर तोडगा? राहुल गांधी आणि गुलाम नबी आझाद एकत्र आल्याने चर्चेला उधाण, शनिवारी होणार कार्यसमितीची महत्त्वाची बैठक

राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. काँग्रेसेमधील अंतर्गत प्रश्नांवर त्यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेतली होती. पक्षाला पूर्णकालीन अध्यक्ष नसल्याने, नेमके निर्णय कोण घेते आहे, हे कळत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. काँग्रेसमधील असंतुष्ट गदट जी-२३ चे मुद्दे सातत्याने उपस्थित करीत राहिल, असेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सिब्बल यांच्या घराबाहेर निषेध म्हणून निदर्शनेही केली होती.

  नवी दिल्ली : लखीमपूर प्रकरणी काँग्रेस शिष्टमंडळाची राष्ट्रपतींशी भेट आणि त्यानंतर एका कार्.क्रमात राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसमध्ये जी-२३ गटाचे नेते गुलाम नबी आझाद कत्र दिसल्याने, काँग्रेसअंतर्गत वादावर तोडगा निघाला की काय, अशा चर्चांना उधाण आले आहे.

  शनिवारी होणार काँग्रेस कार्यसमितीची बैठक
  गुलाम नबी आझाद यांच्या मागणीवरुन काँग्रेस कार्यसमितीची महत्त्वाची बैठक शनिवारी होणार आहे. ही बैठक व्हावी, अशी मागणी कार्यवाहक काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पत्र पाठवून आझाद यांनी केली होती. या बैठकीत सध्याची राजकीय स्थिती, आगामी विधानसभा निवडणुका आणि संघटनात्मक निवडणुकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

  सिब्बलांच्या पत्रकार परिषदेनंतर तणाव वाढला होता
  यापूर्वी राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. काँग्रेसेमधील अंतर्गत प्रश्नांवर त्यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेतली होती. पक्षाला पूर्णकालीन अध्यक्ष नसल्याने, नेमके निर्णय कोण घेते आहे, हे कळत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. काँग्रेसमधील असंतुष्ट गदट जी-२३ चे मुद्दे सातत्याने उपस्थित करीत राहिल, असेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सिब्बल यांच्या घराबाहेर निषेध म्हणून निदर्शनेही केली होती. यानंतर पक्षातील निष्ठावंत आणि असंतुष्ट असा वाद प्रामुख्याने समोर आला होता.

  दोन्ही गट बैठकीत आमनेसामने
  शनिवारी होणार्या बैठकीत पक्षातील निष्ठावंत आणि जी-२३ सदस्य यांच्यात समोरासमोर चर्चा होईल. बैठकीपूर्वी राहुल आणि आझाद एकत्र दिसल्याने या वादावर सामंजस्याने तोडगा काढला जाण्याच्या चर्चांना गती आली आहे. कार्यसमितीच्या बैठकीत संघटनात्मक निवडणुका आणि लखीमपूर प्रकरणात आगामी काळातील दिशा या महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय होण्याची शक्यता आहे. राहुल आणि प्रियंका यांनी लखीमपूरच्या मुद्द्यावर भाजपाला चांगलेच घेरले आहे.