Jewels that have not been hallmarked should not be cracked down on until then; High Court directs Central Government

केंद्र सरकारने हॉलमार्किंगची एचयुआयडी प्रक्रिया तातडीने रद्द करावी, हॉलमार्किंगची व्यवस्था ही अलंकार विक्रीच्या ठिकाणीच लागू असावी, नागरी स्वरूपाच्या गुन्ह्यासाठी नोंदणी रद्द करण्याची तरतूद उद्योगासाठी हानिकारक ठरू शकते, अशी तरतूदही सराफ व्यवसाय संपुष्टात आणेल. याबाबत फेरविचार करावा, एचयुआयडी प्रक्रियेत अनियमिततेसाठी 10 लाखांपर्यंत दंड, तुरुंगवास आणि परवाना रद्दची तरतुद आहे.

    दिल्ली : केंद्र सरकारने सुवर्ण अलंकारांसाठी एचयुआयडी अर्थात ‘हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन डिजिट’ची सक्ती केली आहे. ही प्रक्रिया जाचक असल्याचा आरोप करत देशभरातील सराफ व्यावसायिकांनी आज एकदिवसाचा लाक्षणीक बंद पुकारला होता. सराफांच्या देशव्यापी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

    केंद्र सरकारने हॉलमार्किंगची एचयुआयडी प्रक्रिया तातडीने रद्द करावी, हॉलमार्किंगची व्यवस्था ही अलंकार विक्रीच्या ठिकाणीच लागू असावी, नागरी स्वरूपाच्या गुन्ह्यासाठी नोंदणी रद्द करण्याची तरतूद उद्योगासाठी हानिकारक ठरू शकते, अशी तरतूदही सराफ व्यवसाय संपुष्टात आणेल. याबाबत फेरविचार करावा, एचयुआयडी प्रक्रियेत अनियमिततेसाठी 10 लाखांपर्यंत दंड, तुरुंगवास आणि परवाना रद्दची तरतुद आहे. यामुळे ‘इन्स्पेक्टर राज’ची बळावण्याची भीती आहे. सराफ व्यावसायिकांना सोपी आणि सुटसुटीत प्रणाली अपेक्षित आहे, अशा मागण्या सराफा व्यावसायिकांनी बंदच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे केल्या.

    केंद्र सरकारने देशातील सराफांना युनिक आयडी प्रक्रिया बंधनकारक केली आहे. सराफांनी हॉलमार्कचे स्वागत केले आहे, परंतु या युनिक आयडीला सराफांनी विरोध दर्शवला आहे. ही युनिक आयडी प्रक्रिया विध्वंसक आहे असे त्यांचे मत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इन्स्पेक्टर राज येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

    युनिक आयडी प्रक्रिया रद्द करावी या मागणीसाठी सोमवारी देशभरातील सराफांनी बंद पुकारला. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्र सरकार जाचक अटी व शर्थी लादत असल्याने सराफ व्यवसाय धोक्यात येण्याची भीती आहे. व्यवहारात सोपी व सुटसुटीत प्रक्रिया आणण्याऐवजी केंद्र सरकार आमच्या अडचणीत वाढवत असून आम्हाला मुनीम बनवू पाहत आहे’, असा आरोप करत देशभरातील सराफ व्यावसायिकांनी केंद्र सरकारच्या भूमिकेला जोरदार विरोध दर्शविला.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]