कोरोनाला रोखा अन्यथा देशाला धोका; पंतप्रधान नरेंद्र मोंदींचा इशारा

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेला ताबडतोब थांबवावे लागेल. जगातील अनेक कोरोना प्रभावित देश असे आहेत, ज्यांना कोरोनाच्या अनेक लाटांचा सामना करावा लागत आहे. आपल्या देशात अशी अनेक राज्ये आहेत, जिथे अचानक वाढते कोरोना संक्रमण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश व पंजाबसारख्या अनेक राज्यांमध्ये संक्रमणाचा दर सातत्याने वाडत आहे. जर कोरोनाच्या या लाटेला थांबविले नाही, तर तिचा देशव्यापी परिणामा पाहायला मिळू शकतो असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

  दिल्ली : देशात पुन्हा एकदा जागतिक महामारी कोरोना संक्रमणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कोरोना प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक केली. या बैठकीत पंतप्रधानांनी कोरोना प्रसार रोखण्यासाठी लागू नियमांचे कडक पालन करणे, आरटीपीसीआर व अधिकाधिक लसीकरणासारखी पावले उचलण्याचे निर्देश दिले आहे.

  कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेला ताबडतोब थांबवावे लागेल. जगातील अनेक कोरोना प्रभावित देश असे आहेत, ज्यांना कोरोनाच्या अनेक लाटांचा सामना करावा लागत आहे. आपल्या देशात अशी अनेक राज्ये आहेत, जिथे अचानक वाढते कोरोना संक्रमण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश व पंजाबसारख्या अनेक राज्यांमध्ये संक्रमणाचा दर सातत्याने वाडत आहे. जर कोरोनाच्या या लाटेला थांबविले नाही, तर तिचा देशव्यापी परिणामा पाहायला मिळू शकतो असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

  टेस्ट, ट्रॅक व ट्रिटचा मार्ग धरा

  पंतप्रधानांनी सांगितले की, कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी टेस्ट, ट्रॅक व ट्रिटविषयी आपल्याला गेल्यावर्षी दाखविलेली गंभीरता पुन्हा दाखवाली लागणार आहे. कोरोना संक्रमित व्यक्ती वेळोवेळी ट्रॅक करणे व आरटी-पीसीआर चाचण्यांचा दर 70 टक्क्यांच्या वर ठेवणे महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या लढाईत आपण आज ज्या आत्मविश्वासाने इथे पोहोचलो आहोत तो आत्मविश्वास बेजबाबदारीत बदलू देता कामा नये. आपल्याला लोकांना घाबरावयाचे नसून या चिंतेपासून मुक्ती द्यायची आहे.

  व्हायरस गावात पोहोचू नये

  मोदींनी सांगितले की, आपल्याला लहान शहरांमध्ये चाचण्या वाढविणे आवश्यक आहे. लहान शहरांमध्ये रेफरल सिस्टिम व अॅम्ब्युलन्स नेटवर्कवर विशेष लक्ष द्यावे लागेल, जेणेकरून विषाणूने गावात आपले पाय पसरवू नयेत. जर विषाणू गावापर्यंत पोहोचला तर मोठीच अडचण निर्माण होईल.

  लसीचे डोस फुकट घालवू नका

  देशभरात कोरोना लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. तेलंगण, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाचा आकडा 10 टक्क्यांवर गेला आहे. असे होता कामा नये. देशात दररोज किमान 30 लाख नागरिकांना कोरोना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच राज्यांनी कोरोना लसीचा डोस फुकट जाणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
  राज्यात दररोज 3 लाख लोकांचे लसीकरण

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला आश्वासन देत सांगितले की, राज्यात दररोज 3 लाख लोकांना लस लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल. जिथे लसीकरणाची क्षमता व तयारी आहे, अशी केंद्रे किंवा रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात यावी. लसीकरणासाठी महाराष्ट्रात अनेक खासगी रुग्णालयांनी रजिस्ट्रेशन केले आहे. परंतु त्यातील किती रुग्णालयाची प्रत्यक्ष तयारी आहे हे तपासून लसीकरणाची संख्या वाढविण्यात येईल. उद्धव म्हणाले की, सध्या राज्यात 1,38,957 डोस देयणत येत आहेत, जे अन्य राज्यांच्या तुलनेत समाधानकारक आहेत. जर दररोज 3 लाख डोस देण्यात येतील, तर राज्याकडे 10 दिवसांचा लसींचा साठा वाचेल. केंद्राने लसीचा पुरवठा वाढविण्याची गरज आहे.