वकिलाने बायको शोधण्यासाठी केली अजब जाहिरात, डिमांड वाचून व्हाल हैराण, तुफान व्हायरल

लग्नासंदर्भातील जाहिरातीमध्ये एका व्यक्तीने चक्क सोशल मिडियाचे व्यसन नसणारी मुलगी शोधण्यासाठी जाहिरात केली आहे. ही जाहिरात पाहिल्यांवर अनेक चकीत झाले आहेत. तसेच अनेकांचे लक्ष या जाहिरातीने वेधले आहे. ही जाहिरात पश्चिम बंगालमधील एका २७ वर्षीय वकिलाने केली आहे.

दिल्ली : लग्नासाठी (Marriage) योग्य जोडीदार शोधण्यासाठी अनेक तरुण आणि तरुणी मेट्रोमोनियल (Metromanial advertisement)  वेबसाईट व सोशल मिडियावर जाहिरात (advertisement) करतात. तुम्हीही अनेक वेळा वर्तमानपत्र अथवा विवाह सुचक मंडळाच्या वेबसाईटवर लग्नासंदर्भातील जाहिराती पाहिल्या असतील. त्या वाचण्यात आल्या असतील. त्या जाहिरातीमध्ये तुम्ही पाहिले असेल की, लोक कशाप्रकारे आपल्या जोडीदाराकडून अपेक्षा ठेवतात. ते लिहिताना गोरी, सडपातळ बांधा, घरात सर्वांशी जुळवून घेणारी अशा डिमांड लिहितात. परंतु आज जी जाहिरात तुम्ही पाहाल त्याने तुम्ही चकीतच व्हाल. जी सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.

लग्नासंदर्भातील जाहिरातीमध्ये एका व्यक्तीने चक्क सोशल मिडियाचे व्यसन नसणारी मुलगी शोधण्यासाठी जाहिरात केली आहे. ही जाहिरात पाहिल्यांवर अनेक चकीत झाले आहेत. तसेच अनेकांचे लक्ष या जाहिरातीने वेधले आहे. ही जाहिरात पश्चिम बंगालमधील एका २७ वर्षीय वकिलाने केली आहे. तसेच या जाहिरातीचा फोटो आयएएस अधिकारी नितिन सांगवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, भावी नवरदेव/नवरी, कृपया लक्ष द्या. मॅचिंग होण्याचा क्रायटेरिया बदलत आहे.

काय आहे जाहिरातीमध्ये, पाहा 

या जाहिरातीत नवदेव मुलाने लिहिले आहे की, चॅटर्जी ३७/५’७  योग व्यवसाय, सुंदर, गोरा, निर्व्यसनी, उच्च न्यायालयात वकील आणि रिसर्चर. कुटुंबात आई-वडील आणि कार आहे. कामरपुकूर या गावी घरही आहे. कसल्याही प्रकारच्या मागणीशिवाय नवरदेव मुलगा, सुंदर, उंच आणि सडपातळ मुलगी शोधत आहे. मुलीला सोशल मीडियाचे व्यसन नसावे. अशा आशयाची जाहिरात दिली आहे. त्यामुळे ही जाहिरात सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाली आहे. अनेक लोकांनी या जाहिरातीवर वेगवेगळ्या शैलीचे विनोद तयार केले आहेत.