प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएने कडक नियमांचं पत्रकच जारी केलं आहे. विमानात प्रवाशानं मास्क योग्य पद्धतीनं घातला नसेल किंवा कोरोना नियमांचं पालन केलं जात नसेल तर अशा प्रवाशांना विमानातून तातडीनं खाली उतरवलं जावं, असे आदेशच डीजीसीएने दिले आहेत. डीजीसीएनं सर्व विमानतळ व्यवस्थापन, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि सीआयएसएफ यांना नव्या नियमांचं पत्रक पाठवलं आहे. त्यासोबत नव्या सूचना तात्काळ अंमलात आणल्या जाव्यात आणि नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे.

    दिल्ली : देशभरात पून्हा एकदा कोरोनाचा कहर वाढला आहे. मात्र, अजूनही नागरीकांचा बेजबाबदारपणा पहायला मिळत आहे. सर्सासपणे कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. या पार्श्वभूमीवर विमान वाहतूक महासंचालनालयानं(डीजीसीए) एक मोठा निर्णय घेतला आहे.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएने कडक नियमांचं पत्रकच जारी केलं आहे. विमानात प्रवाशानं मास्क योग्य पद्धतीनं घातला नसेल किंवा कोरोना नियमांचं पालन केलं जात नसेल तर अशा प्रवाशांना विमानातून तातडीनं खाली उतरवलं जावं, असे आदेशच डीजीसीएने दिले आहेत.
    डीजीसीएनं सर्व विमानतळ व्यवस्थापन, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि सीआयएसएफ यांना नव्या नियमांचं पत्रक पाठवलं आहे. त्यासोबत नव्या सूचना तात्काळ अंमलात आणल्या जाव्यात आणि नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे.

    अनेक विमान प्रवासी कोविड-१९ संदर्भातील नियमांचं पालन करत नसल्याचं समोर आलं आहे. अनेक प्रवासी यात काहीजण विमानतळावर प्रवेश केल्यानंतर मास्क वापरत नसल्याचं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नसल्याचंही निदर्शनास आलं आहे, असं डीजीसीएनं लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.

    विमान प्रवासावेळी विमानतळात प्रवेश केल्यापासून ते आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचेपर्यंत प्रवाशांना मास्क घालून ठेवावा. मास्क नाकाखाली नसावा. कोविड-१९ संदर्भातील नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना सक्त ताकीद देऊन त्यांना विमानतळावरील सुरक्षा रक्षकांच्या हवाली करण्यात येईल आणि योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असं डीजीसीएनं पत्रकात म्हटलं आहे.