subramanyam swami

नॅशनल हेराल्ड प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या याचिकेत न्यायालयाचे जनरल सेक्रेटरी रजनीश कुमार झा, आयकर उपायुक्त साकेत सिंह आणि काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यास कोर्टात उपस्थित राहण्यास सांगावे, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

दिल्ली : भाजपा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात साक्षीदारांना उपस्थित करण्याच्या मुद्यावर कोर्टात धाव घेतली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अन्य यांच्या विरोधात त्यांनी खटला दाखल केला आहे.

न्यायालयात सादर करण्यात आलेल्या याचिकेत न्यायालयाचे जनरल सेक्रेटरी रजनीश कुमार झा, आयकर उपायुक्त साकेत सिंह आणि काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यास कोर्टात उपस्थित राहण्यास सांगावे, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

दस्तावेजात उल्लेख करण्यात आल्यामुळेच या साक्षीदारांची साक्ष आवश्यक असल्याचेही सुब्रह्मण्यम स्वामींनी याचिकेत म्हटले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवींद्रकुमार पांडेय यांनी शनिवारी या प्रकरणावरील सुनावणी २३ डिसेंबरपर्यंत स्थगित केली आहे.

या प्रकरणातील संबंधित आरोपी पक्षाचे वकील सुनावणीला उपस्थित राहिले नव्हते. यापूर्वी न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना समाधानकारक तोडगा काढण्यास सुचविले होते.