subramanyam swami

जम्मू-काश्मीरचे (jammu kashmir)अनुच्छेद ३७०(article 370) हटविल्यानंतर भारत पाकव्याप्त काश्मीरकडे(POK) वळवणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. तसेच स्वातंत्र्यासाठी मदत करण्याचे आवाहन बलुचिस्तानमधून केले जात होते. मात्र, आता भाजपच्याच एका खासदाराने घरचा आहेर देत या दोन्ही गोष्टी आता विसरून जा, असे म्हटले आहे.

    दिल्ली:  पाकव्याप्त काश्मीर (पीओके)(POK) भारताचाच भाग असून, तो पुन्हा मिळवण्याकरिता प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात होते. जम्मू-काश्मीरचे अनुच्छेद ३७० हटविल्यानंतर भारत पाकव्याप्त काश्मीरकडे वळवणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. तसेच स्वातंत्र्यासाठी मदत करण्याचे आवाहन बलुचिस्तानमधून केले जात होते. मात्र, आता भाजपच्याच एका खासदाराने घरचा आहेर देत या दोन्ही गोष्टी आता विसरून जा, असे म्हटले आहे.

    भाजपाचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी ट्विटरवर कायम सक्रिय असतात. पाकिस्तानसंदर्भात भारत सरकारच्या धोरणावरून स्वामी यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर पीओकेवर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून जा, असे स्वामी यांनी म्हटले आहे.

    एका ट्विटर युझरने एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत स्वामी यांना टॅग करत भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या संबंधांवर समाधानी आहात का, अशी विचारणा केली. यावर उत्तर देताना पाकव्याप्त काश्मीरवर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून गेले पाहिजे, असे उत्तर स्वामी यांनी दिले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या युद्धाभ्यासावर स्वामी नाखुश असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे स्वामी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे.