वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, स्वतःवरच झाडली गोळी

वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरपी शर्मा यांना मानेला गोळी लागली आहे. त्यांना तात्काळ कोलंबिया एशिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. आरपी शर्मा यांना कर्करोगाची लागण झाली आहे.

दिल्ली : कर्नाटकाचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी ( senior IPS officer) आरपी शर्मा यांनी स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉलवरमधून गोळी झाडली आहे. (shot himself)

वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरपी शर्मा यांना मानेला गोळी लागली आहे. त्यांना तात्काळ कोलंबिया एशिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. आरपी शर्मा यांना कर्करोगाची लागण झाली आहे.

आरपी शर्मा यांनी अनेक मोठ्या प्रकरणांत काम केलेले आहे. बीएसवाय मंत्रिमंडळातील गृहमंत्री आणि महसूल मंत्री यांना त्यांनी अटक केली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसा, आरपी शर्मा हे अनेक रोगांनी ग्रासले होते. आरपी शर्मा यांनी असे सांगितले की त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नाही. चुकून गोळी बंदूकीतुन सुटल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.