wife said that she like her husband as brother so he get second marriage

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू असलेल्या ऑनलाईन सुनावणीदरम्यान शर्ट परिधान न करता एक व्यक्ती कॅमेऱ्यासमोर आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे.(supreme court angered over watching shirtless man in online hearing)

दिल्ली: व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू असलेल्या ऑनलाईन सुनावणीदरम्यान शर्ट परिधान न करता एक व्यक्ती कॅमेऱ्यासमोर आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे.(supreme court angered over watching shirtless man in online hearing) मागील सात ते आठ महिन्यांपासून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली जात आहे. तरीही असे प्रकार घडत आहेत, अशा शब्दात न्यायालयाने संबंधिताला फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि हेमंत गुप्ता यांच्या खंठपीठासमोर एका याचिकेवर व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरू होती. सुनावणी सुरू असतानाच एक अंगावर शर्ट न घातलेला उघडा व्यक्ती स्क्रीनवर दिसू लागला. अचानक हे दृश्य पाहून न्यायायमूर्तींचा संयम सुटला. न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त करत फटकारले.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला सुरूवात होऊन सात, आठ महिने लोटले आहेत. तरीही असे प्रकार घडत आहेत. असे घडायला नको, अशा शब्दात न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांनी या प्रकारवर संताप व्यक्त केला. उल्लेखनीय आहे की, कोरोनाने देशात शिरकाव केल्यानंतर अनेक बदल झाले आहे. जीवनशैलीबरोबरच कामाच्या पद्धतीही बदलल्या आहेत. अगदी न्याय व्यवस्थाही यातून सुटलेली नाही. न्यायालयांनाही व्हीडिओ कॉन्फरन्सिगद्वारे सुनावण्या घ्याव्या लागल्या. या सुनावण्यावेळी अनेक गंमतीशीर प्रसंगही घडले. यापूर्वी, 26 ऑक्टोबर रोजी असाच प्रसंग घडला होता. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंठपीठासमोर सुनावणी सुरू असताना एक वकील शर्ट न घालताच स्क्रीन समोर आला होता. हे बघून न्यायालयाला धक्काच बसला होता. त्यावेळी न्यायालयाने वकिलांची कानउघडणी केली होती.