…म्हणून कोरोना रुग्णांच्या घराबाहेर पोस्टर लावले जातात;  नेमकं काय सांगीतले सरकारने सुप्रीम कोर्टाला

दिल्ली : कोरोनाबाधित रुग्णाच्या घराबाहेर पोस्टर लावण्याशी संबंधित असलेल्या प्रकरणाची मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची भूमिका मांडली. कोरोनाबाधित रुग्णाच्या घराबाहेर पोस्टर लावल्यामुळे समाजाकडून त्यांना अस्पृश्यतेची वागणूक दिली जाते, अशी खंत सर्वोच्च न्यायालयाने बोलून दाखविली.

याप्रकरणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारची बाजू मांडली. पोस्टर लावणे हा महत्त्वाचा नियम नाही. याचा उद्देश कोरोना रुग्णांची बदनामी करण्याचा नाही, तर दुसऱ्यांची सुरक्षा करणे हा आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी काही राज्ये हा मार्ग अवलंबत आहेत.

सरकारची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्या. अशोक भूषण, न्या. आर. सुभाष रेड्डी आणि न्या. एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने वास्तव भिन्न असल्याचे सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता गुरुवारी होणार आहे.