महाराष्ट्रासह या राज्यांना डॉक्टरांचे पगार वेळेत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

  • सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवरही ताशेरे ओढले आहेत. केंद्र सरकारने देशातील वैद्यकीय क्षेत्रातील विविध राज्यांतील डॉक्टर्स तसेच कर्मचाऱ्यांचा पगार झाला आहे का नाही याकडे लक्ष दिले पाहिजे.

दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब आणि त्रिपुरा राज्यांवर ताशेरे ओढले आहेत. कोरोना काळात या राज्यांतील सरकारने डॉक्टरांच्या वेतन कपात केले आहेत. तसेच वेतन दो ते तीन महीने दिलेले नाही. यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजीचा सूर ओढला आहे. तसेच यापुढे हे वेतन सर्व राज्यातील सरकारने वेतन वेळेत देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच क्वारंटाई कालावधीतील डॉक्टरांना सुट्टी प्रमाणे घालवण्यावर नाराजी व्यक्त केली आहे तसेच या कालावधीत डॉक्टरांचे तसेच कर्मचाऱ्यांचा पगार कपात केला जाणार नाही याकडे लक्ष वेधले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवरही ताशेरे ओढले आहेत. केंद्र सरकारने देशातील वैद्यकीय क्षेत्रातील विविध राज्यांतील डॉक्टर्स तसेच कर्मचाऱ्यांचा पगार झाला आहे का नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. असे न्यायालयाने सुचक वाक्यात म्हटले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र, कर्नाटक, त्रिपुरा, पंजाब या राज्यांत चाचणी, तपासणी आणि इतर आरोग्य सुविधांवर राज्य सरकारने भर द्यावा तसेच आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना योग्य वेळेत सुट्टी द्यावी तसेच त्यांना वेतन वेळेवर देण्यात यावे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली काम करावे. आणि केंद्र सरकार असाह्य नाही केंद्र सरकारला कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.