सुशीलकुमार शिंदे यांचं पक्षाच्या सद्यस्थितीबाबत धक्कादायक विधान, म्हणाले…

पुण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये सुशील कुमार शिंदे म्हणाले की, काँग्रेसमधील चर्चा आणि संवादाची परंपरा आता संपुष्टात आली आहे. मला याचे खूप दु:ख वाटते. पक्षाला याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आमची धोरणे चुकीची असू शकतात. अशा परिस्थितीत त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी अशा सत्रांची गरज आहे.

    नवी दिल्ली – गेल्या काही काळापासून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत कुरमुरी वाढत आहेत.  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या नावाची भर पडली आहे. सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी पक्षाच्या सद्यस्थितीबाबत मोठे आणि धक्कादायक विधान केले आहे. काँग्रेसमध्ये आता संवाद आणि चर्चेची परंपरा संपुष्टात आली आहे. पक्ष चुकीच्या धोरणांवरून वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत पक्षाला योग्य वाटेवर आणण्यासाठी आत्मचिंतनाची गरज आहे.