election commission

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाकलेला दबाव आणि होणारा छळ सहन न झाल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असे वक्तव्य उदयनिधी स्टॅलिन यांनी केले होते. या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला होता. निवडणूक आयोगाने स्टॅलिन यांना उत्तर देण्यास सांगितले आहे. स्टॅलिन उत्तर देण्यास असमर्थ ठरल्यास कारवाई केली जाईल असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

    दिल्ली :  मोदींच्या छळामुळे सुषमा स्वराज-जेटलींचे निधन झाल्याच्या वक्तव्याची दखल घेत निवडणूक आयोगाने द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना नोटीस पाठवली आहे. दिवंगत भाजपा नेते सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावरून ही नोटीस पाठविण्यात आली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाकलेला दबाव आणि होणारा छळ सहन न झाल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असे वक्तव्य उदयनिधी स्टॅलिन यांनी केले होते. या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला होता. निवडणूक आयोगाने स्टॅलिन यांना उत्तर देण्यास सांगितले आहे. स्टॅलिन उत्तर देण्यास असमर्थ ठरल्यास कारवाई केली जाईल असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

    निवडणूक आयोगाने नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भाजपाने आमच्याकडे 2 एप्रिलला तक्रार केली असून उदयनिधी स्टॅलिन यांनी 31 मार्चला एका रॅलीत संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला छळ आणि दबावामुळे सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा मृत्यू झाल्याचे वक्तव्य केल्याचे सांगितले आहे. स्टॅलिन यांनी आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.