कोरोनाच्या लसीमध्ये ‘गायीच्या रक्ताचा वापर’ स्वामी चक्रपाणी यांचा अजब दावा

. जोपर्यंत कोरोनाची लस कशा पद्धतीने बनवण्यात आली आहे, हे स्पष्टपणे सांगितलं जात नाही आणि ही लस एखाद्या व्यक्तीच्या धर्माविरोधात तर नाही हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत या लसीचा भारतात वापर केला जाऊ नये- स्वामी चक्रपाणी

नवी दिल्ली: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. तयार कारण्यात आलेल्या लसीच्या चाचण्या करण्याचे काम सुरू झाले. मात्र कोरोनावरील लसीच्या निर्मितीमध्ये गायीच्या रक्ताचा वापर केल्याचा अजब दावा हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणी यांनी केला आहे. देशात गायीचे रक्त असलेल्या लसीचा वापरण्याची परवानगी देऊ नये,  अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना चक्रपाणीनी यासंदर्भात एक निवेदनही दिल्याची माहिती मिळत आहे. जोपर्यंत कोरोनाची लस कशा पद्धतीने बनवण्यात आली आहे, हे स्पष्टपणे सांगितलं जात नाही आणि ही लस एखाद्या व्यक्तीच्या धर्माविरोधात तर नाही हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत या लसीचा भारतात वापर केला जाऊ नये, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

स्वामी चक्रपाणिच्या म्हण्यानुसार “कोरोना संपला पाहिजे आणि लसही लवकरात लवकर देण्यात आली पाहिजे. मात्र यासाठी आपला धर्म भ्रष्ट करता येणार नाही. जेव्हा कोणतीही कंपनी एखादे औषध बनवते तेव्हा त्यामध्ये काय आहे, याची माहिती दिली जाते. मग कोरोनाच्या लसीसंदर्भातील माहिती का सार्वजनिकरित्या उपलब्ध करून दिली जात नाही. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकामध्ये जी लस तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये गायीचं रक्त वापरण्यात आलं आहे” असा दावा केला आहे.

सनातन धर्म संपवण्यासाठीचा कट
“सनातन धर्मामध्ये गायीला मातेसमान मानण्यात येते. जर गायीचे रक्त आपल्या शरीरामध्ये गेले तर तो आपला धर्म भ्रष्ट करण्याचा प्रयत्न असेल. सनातन धर्माला संपवण्यासाठी अनेक वर्षांपासून असे कट रचले जात आहेत. त्यामुळेच कोरोनाची कोणतीही लस येत असेल तर आधी त्यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली जावी. जेव्हा सर्व शंका दूर होतील त्यानंतरच लसीकरणाचे काम हाती घेण्यात यावे ” असे देखील स्वामी चक्रपाणि यांनी म्हटले आहे.